घरIPL 2020IPL 2020 : सूर्यकुमार, पोलार्डसारखे फलंदाज असणे फायदेशीर - डी कॉक

IPL 2020 : सूर्यकुमार, पोलार्डसारखे फलंदाज असणे फायदेशीर – डी कॉक

Subscribe

मधल्या फळीत अनुभवी फलंदाज असणे कधीही फायदेशीर ठरते, असे डी कॉकला वाटते.

गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएल मोसमात अप्रतिम कामगिरी केली आहे. मुंबईने १२ पैकी ८ सामने जिंकले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ १६ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असून यंदा प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. मुंबईच्या या यशात सलामीवीर क्विंटन डी कॉकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत १२ सामन्यांत ४ अर्धशतकांच्या मदतीने ३९२ धावा केल्या असून तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने त्याच्या या यशाचे श्रेय मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना दिले आहे.

मधल्या फळीत अनुभवी फलंदाज असणे कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे आमची सलामीवीर म्हणून मानसिकता बदलते असे मी म्हणणार नाही. आम्ही संघाला नेहमीच चांगली आणि आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतो. सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या यांच्यासारखे फलंदाज मधल्या फळीत असल्याने सलामीवीर म्हणून माझ्यावरील दबाव नक्कीच कमी होतो. तसेच हे तिघे फलंदाजीला येतात, तेव्हा मी खेळपट्टीवर असेन, तर त्यांना जास्त चेंडू खेळण्याची संधी देतो. हे तिघे माझ्यापेक्षा मोठे फटके मारू शकतात हे मला माहित आहे, असे डी कॉक म्हणाला.

- Advertisement -

तसेच रोहित शर्मासोबत असो, की ईशान किशनसोबत, सलामीवीर म्हणून माझ्या खेळात काहीच बदल होत नाही, असेही डी कॉकने सांगितले. मी आणि ईशान, आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतो. ईशान युवा आणि खूपच प्रतिभावान फलंदाज आहे. तसेच तो सुरुवातीपासून मोठे फटके मारू शकतो. याचा मला फायदा होतो, असेही डी कॉकने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -