घरक्रीडा'या' वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने होणार

‘या’ वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने होणार

Subscribe

वनडे वर्ल्डकप प्रमाणे आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही खेळवली जात आहे. किकेटविश्वात कसोटी टीकून राहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली आहे. अशातच आता आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

वनडे वर्ल्डकप प्रमाणे आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही खेळवली जात आहे. किकेटविश्वात कसोटी टीकून राहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली आहे. अशातच आता आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच, या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी सर्व संघ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणता संघ विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ICC World Test Championship Finals Of 2023 And 2025 Will Be At Lords)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने दिलेल्या माहितीनुसार २०२३ आणि २०२५ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. त्या वर्षीच्या जूनमध्ये हे सामने होणार आहे. याबाबत २६ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. तसेच या काळात इंग्लंडमध्ये काऊंटी हंगाम सुरू असतो. त्यामुळे ऐनवेळी ठिकाणाबाबत गोंधळ होऊ नये, म्हणून आयसीसीने अगोदरच लॉर्ड्सची निवड केली आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी हे स्पष्ट केले.

- Advertisement -

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामना २०२१ मध्ये झाला असून न्यूझीलंड संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. हा सामना देखील लॉर्ड्सवर खेळवला जाणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे हा सामना साउथम्प्टनमधील एजेस बाउल येथे खेळवण्यात आला होता.

दरम्यान, आयसीसीने न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी आणि भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सध्याचे खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. तसेच, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर हार्परची पूर्व खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकच्या ईश्वरी सावकारची बीसीसीआय हाय-परफॉर्मन्स कॅम्पसाठी निवड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -