घरक्रीडाInd vs Nz 2nd test : भारताचा वानखेडेवर मोठा विजय, १-० ने...

Ind vs Nz 2nd test : भारताचा वानखेडेवर मोठा विजय, १-० ने मालिका जिंकली

Subscribe

भारताने न्यूझीलंडविरोधात चौथ्याच दिवशी कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकत मालिका जिंकण्याचा विक्रम केला. न्यूझीलंडला भारताने ५४० धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीमुळे ३७२ इतक्या मोठ्या फरकाने भारताने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात जयंत यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत ४ विकेट्स घेत मोठी कामगिरी केली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या १६७ धावात तंबूत परतला. संघातील तीन खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ६० धावांची खेळी ही डॅरेल मिशेलने केली. तर हेनरी निकोलसने ४४ धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय फिरकीसमोर न्यूझीलंडच्या संघाची फलंदाजी कोलमडून पडली.

- Advertisement -

भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स या रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी ४ यानुसार घेतल्या. तर अक्सर पटेलला एक विकेट मिळाली. कसोटीच्या चौथ्या दिवशीच पहिल्या सत्रातच न्यूझीलंडचा संपुर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे पुन्हा एकदा वानखेडेवर संपुर्ण पाच दिवसाचा सामना न झाल्याचा आणखी एक सामना न्यूझीलंडविरोधातील सामना ठरला आहे. न्यूझीलंडच्या संघातील दोन खेळाडूंचा अपवाद वगळला तर इतर कोणत्याच खेळाडूंना फलंदाजीत चमकदार कामगिरी करता आली नाही. भारताने दिलेल्या विशाल टार्गेटचा पाठिंबा करताना न्यूझीलंडच्या खेळाडूंची दमछाक झाली. अवघ्या पाच धावांमध्ये न्यूझीलंडचे पाच गडी बाद करण्याची किमया भारतीय फिरकी गोलंदाजांनी सकाळच्या पहिल्याच सत्रात केली. त्यामुळे ५१ व्या ओव्हरमध्ये १६२ धावांवर सहा विकेट्स असतानात १६७ धावांमध्ये संपूर्ण संघ तंबूत गेला. आजच्या दिवसातील पहिल्याच सत्रात रचिन रवींद्र, काएल जेमीसन, टीम साऊदी, विलिअम समरविल आणि हेनरी निकोलस हे खेळाडू अवघ्या पाच धावांमध्ये तंबूत परतले. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघासमोरील मोठ्या लक्ष्याविरोधात मोठ्या खेळाडूंनाही चांगली खेळी करता आली नाही हे सिद्ध झाले.

कानपूर कसोटीमध्ये भारताला शेवटची विकेट घेताना दमछाक झाली होती. त्यामुळे कानपूर कसोटी मालिका जिंकण्याची भारताची संधी हुकली होती. पण दुसरीकडे मात्र मुंबई कसोटी खिशात घालत भारताने मालिकेत विजय मिळवला. न्यूझीलंडचे १९८८ पासूनचे स्वप्न हे अपूर्णच राहिले. भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्याचे न्यूझीलंडच्या संघाचे १९८८ पासूनचे स्वप्न विराट सेनेने यंदाही पूर्ण होऊ दिले नाही.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -