घरक्रीडाT20 world cup 2021: भारताच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल; सेमी फायनलचे नवे समीकरण...

T20 world cup 2021: भारताच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल; सेमी फायनलचे नवे समीकरण काय?

Subscribe

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने धमाकेदार कमबॅक केला आहे. अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा देखील दारूण पराभव केला आहे. सलग दोन मोठ्या विजयानंतर आता भारतीय संघाच्या नेट-रनरेटमध्ये देखील चांगली सुधारणा झाली आहे. अशातच भारतीय संघाची उपांत्य फेरी गाठण्याची आशा अजून वाढली आहे. पण अजूनही भारतीय संघाला उपांत्य फेरीचा मार्ग तितका सोपा नाही. कारण भारतीय संघाला आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचा नेट-रनरेट ढासळला होता. पण त्यानंतरच्या सलग २ सामन्यांत मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकतो, अशी शक्यता आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडच्या संघाला अवघ्या ८५ धावांवर गुंडाळले. तर भारताला नेट-रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडच्या पुढे जाण्यासाठी स्कॉटलंडने दिलेल्या आव्हानाला ५३ चेंडूत पूर्ण करायचे होते. तर अफगाणिस्तानपेक्षा नेट-रनरेटने पुढे जाण्यासाठी या आव्हानाला अवघ्या ४३ चेंडूत पूर्ण करायचे होते. भारतीय संघाने अशीच खेळी करत ८६ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग केवळ ७ षटकांत पूर्ण केला.

- Advertisement -

स्कॉटलंड सोबतच्या या विजयानंतर भारतीय संघाने ग्रुप बी च्या क्रमवारीत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर मजल मारली. लक्षणीय बाब म्हणजे भारताचा नेट-रनरेट न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानपेक्षा चांगला झाला आहे. म्हणजेच जर उपांत्य फेरी गाठण्यासाठी नेट-रनरेटची चर्चा झाली तर भारतीय संघाला याचा खूप फायदा होऊ शकतो.

ग्रुप बी मध्ये सर्वोत्कृष्ठ नेट-रनरेट

अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा दारूण पराभव केल्यानंतर भारतीय संघ ४ अंकासह ग्रुप बी च्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताचा नेट-रनरेट +१.६१९ एवढा झाला आहे. आता भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुढच्या सामन्यात नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे. तर यासोबतच न्यूझीलंडचा त्यांच्या पुढच्या सामन्यात पराभव झाला तर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग आणखी सुखकर होईल. न्यूझीलंडचा पुढील सामना अफगाणिस्तान सोबत होणार आहे.

भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी असा आहे मार्ग

  • भारतीय संघाने नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करणे.
  • अफगाणिस्तानने पुढच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करणे
  • असे झाल्यास तीन संघाचे ६ गुण होतील
  • तेव्हा नेट-रनरेट वर उपांत्य फेरीचा संघ ठरवला जाईल.
  • यामुळे भारतीय संघाला फायदा होईल.
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -