घरक्रीडाIND vs WI: रोहित शर्माचे प्लेइंग XI बाबत मोठे संकेत, विंडीजविरोधात पहिल्या...

IND vs WI: रोहित शर्माचे प्लेइंग XI बाबत मोठे संकेत, विंडीजविरोधात पहिल्या वनडेत हे 11 खेळाडू दिसणार

Subscribe

भारतीय कर्णधार तूर्तास आघाडीच्या फळीत नवीन तरुणांना संधी देण्याबाबत काहीही बोललेले नाहीत. म्हणजेच मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांचा समावेश असेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मात्र, दीपक चहर खेळण्याची शक्यता जास्त आहे.

नवी दिल्लीः वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी (First ODI) टीम इंडियाने आपले पत्ते आताच उघडलेत. आघाडीवर कोणते खेळाडू मैदानात उतरणार, याची माहिती पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने दिलीय. यासोबतच त्याने गोलंदाजांबाबतही मोठा खुलासा केलाय. प्लेइंग इलेव्हनबद्दल त्याने स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी हातवारे करून त्याने बरेच संकेत दिलेत.

आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळणारे 11 चेहरे कोण असतील, याचे उत्तर मिळू शकणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवार 6 फेब्रुवारीला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमध्येच खेळले जाणार आहेत.

- Advertisement -

मयंक अग्रवाल अजूनही क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे रोहित शर्माने इशान किशनला आघाडीवर उतरवण्यासाठी परवानगी दिलीय. म्हणजे प्लेइंग इलेव्हनच्या सलामीच्या जोडीचे चित्र स्पष्ट झालेय. ही जोडी रोहित शर्मा आणि इशान किशनची असणार आहे. वनडेमध्ये हे दोन खेळाडू पहिल्यांदाच एकत्र सलामी देणार आहेत.

ही भारताची मधली फळी असू शकते

भारतीय कर्णधार तूर्तास आघाडीच्या फळीत नवीन तरुणांना संधी देण्याबाबत काहीही बोललेले नाहीत. म्हणजेच मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांचा समावेश असेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मात्र, दीपक चहर खेळण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisement -

कुलदीप-चहलची जोडी पुन्हा एकत्र दिसणार

फिरकी प्रकारात ‘कुलचा’ म्हणजेच कुलदीप आणि चहलची जोडी एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मानेही पत्रकार परिषदेत तसे संकेत दिलेत. या दोघांनी पहिल्यांदाच जोडीमध्ये खूप चांगली कामगिरी केलीय. मध्येच ही जोडी तुटली कारण आम्ही इतर जुळवाजुळव शोधू लागलो. पण मला वाटतं आता त्यांना एकत्र खेळायलं देणं जास्त चांगलं होणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दीपक चहर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, प्रशांत कृष्णा, मोहम्मद सिराज


हेही वाचाः IND vs WI : ऋषभ पंत मालामाल, मोठा करार करत विराट-रोहितच्या खास यादीत समावेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -