घरक्रीडाIND W vs NZ W: लागोपाठ चौथ्या पराभवाचं खापर मिताली राजनं फोडलं...

IND W vs NZ W: लागोपाठ चौथ्या पराभवाचं खापर मिताली राजनं फोडलं गोलंदाजांवर, म्हणाली…

Subscribe

न्यूझीलंडकडून चौथा वनडे हरल्यानंतर मिताली राज म्हणाली, 'आम्ही गोलंदाजी आणि फिरकी आक्रमणात वेगवेगळे प्रयोग करत आहोत. विश्वचषकापूर्वी गोलंदाजी हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. गोलंदाजांची लाईन-लेन्थ चांगली नव्हती. गोलंदाजीचा स्पेल परिपूर्ण नव्हता.

नवी दिल्लीः न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचे खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करून वनडे सीरिज गमावणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागलाय. वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचे गोलंदाज हा चिंतेचा विषय आहे, असंही मिताली राजनं सांगितलं. टीम इंडियाने न्यूझीलंड मालिकेत (IND W vs NZ W) वेगवेगळ्या गोलंदाजांना गोलंदाजी देऊन पाहिल्याचं तिने सांगितलंय. विशेष म्हणजे मिताली राजने घाईघाईत 52 धावा करणाऱ्या रिचा घोषचंही कौतुक केलेय. मितालीने तिला टीम इंडियाचे भविष्य म्हटलेय.

न्यूझीलंडकडून चौथा वनडे हरल्यानंतर मिताली राज म्हणाली, ‘आम्ही गोलंदाजी आणि फिरकी आक्रमणात वेगवेगळे प्रयोग करत आहोत. विश्वचषकापूर्वी गोलंदाजी हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. गोलंदाजांची लाईन-लेन्थ चांगली नव्हती. गोलंदाजीचा स्पेल परिपूर्ण नव्हता. आम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.” मिताली राजने रिचा घोषचे कौतुक केले. ती म्हणाली, ‘मी ऋचा घोषची फलंदाजी पाहत होते. ती खूप प्रतिभावान खेळाडू आहे. ती टीम इंडियाचे भविष्य आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडचा एकतर्फी विजय

अमेलिया केरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 63 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आणि क्लीन स्विपकडे पाऊल टाकले. पावसामुळे सामना पाच तास उशिरा सुरू झाला, त्यामुळे 20 षटके कमी झाली. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर न्यूझीलंडने अमेलिया केरच्या 33 चेंडूत नाबाद 68 आणि सुझी बेट्सच्या 26 चेंडूत 41 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 191 धावा केल्यात.

मोठ्या धावसंख्येसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी डगमगली. एका क्षणी त्यांची धावसंख्या चार बाद 19 अशी होती आणि शेवटी त्यांचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत 128 धावांत बाद झाला. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने 52 धावा केल्या. अमेलियाने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करत 30 धावांत तीन बळी घेतले. रिचा वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे भारताला या दौऱ्यात सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकदिवसीय मालिकेपूर्वी भारत एकमेव टी-20 सामनाही हरला होता.

- Advertisement -

भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पुढील प्रत्येक सामन्यात खराब राहिली आणि मंगळवारी त्यांनी अत्यंत खराब खेळ दाखवला. राजेश्वरी गायकवाड (चार षटकात 26 धावांत 1 बळी) वगळता अन्य कोणताही भारतीय गोलंदाज छाप पाडू शकला नाही. अमेलियाने मेघना सिंग (चार षटकात 1/45) आणि दीप्ती शर्मा (चार षटकात 1/49) यांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. सोफी डिव्हाईन (24 चेंडूत 32 धावा) आणि बेट्स यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. मैदानावर एकत्रित आल्यानंतर अमेलिया आणि एमी सथरवेट (16 चेंडूत 32) यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.

भारताला 192 धावांचे लक्ष्य गाठणे अवघड होते, तर खराब फॉर्मात असलेल्या हरमनप्रीत कौरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. स्मृती मानधना (13) बराच वेळ आयसोलेशनमध्ये राहिल्याने लयीत दिसली नाही, तर शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांना खातेही उघडता आले नाही. पाचव्या षटकात भारताची धावसंख्या चार बाद 19 अशी होती, ज्यामुळे सामन्याचा निकालही निश्चित झाला. रिचा आणि कर्णधार मिताली राज (28 चेंडूत 30) यांनी पाचव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली, पण त्यामुळे पराभवाचे अंतर कमी झाले. रिचाने या खेळीत चार चौकार आणि तब्बल षटकार मारले. अमेलियाची बहीण जेसनेही दोन बळी घेतले, तर फ्रान्सिस मॅकेने दोन आणि हॅल जेन्सनने तीन बळी घेतले होते.


हेही वाचाः Airthings Masters : जगज्जेत्या कार्लसनला मात देणारा १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आहे तरी कोण?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -