घरक्रीडाअर्शदीपच्या जबरदस्त खेळीनं भारताचा बांगलादेशवर विजय, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित

अर्शदीपच्या जबरदस्त खेळीनं भारताचा बांगलादेशवर विजय, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित

Subscribe

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशपुढे 185 धावांचं लक्ष्य होतं. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू झाला होता.

टी 20 विश्वचषक 2022 मध्ये आज अ‍ॅडलेड ओव्हलवर भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवलाय. पावसानं व्यत्यय आणल्यानंतरही भारतानं मैदानावर परतत 5 धावांनी शानदार विजयी खेळी केली. त्यामुळे उपांत्य फेरीतील भारताचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशपुढे 185 धावांचं लक्ष्य होतं. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू झाला होता. अशातच बांगलादेशासाठी 16 षटकांत 151 धावांचं लक्ष्य होतं. पाऊस येईपर्यंत भारत बॅकफूटवर होता, परंतु त्यानंतर भारतानं मैदानावर परतत कहर माजवला. भारताकडून विराट कोहलीने 44 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी केली. बांगलादेशकडून हसन महमूदने 3 बळी मिळवले.

- Advertisement -

हार्दिक पांड्याने 13व्या षटकात बांगलादेशला सलग दोन धक्के दिले. दुसऱ्या चेंडूवर यासिर अलीला (1) पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर पांड्याने मोसाद्देक हुसेनचा (6) बळी मिळवला. 12व्या षटकात मैदानावर गोलंदाजीसाठी आलेल्या अर्शदीप सिंगने बांगलादेशला सलग दोन धक्के दिलेत. अर्शदीपने शाकिबचा (13) बळी मिळवला. उजव्या हाताचा फलंदाज नुरुल हसन क्रीझवर आल्यानंतर अर्शदीप सिंगने 12व्या षटकाच्या चेंडूवर भारताला आणखी एक यश मिळवून दिले. अर्शदीपने अफिफ हुसैनला 5 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

तत्पूर्वी बांगलादेशने शानदार फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 60 धावा केल्या होत्या. संघाच्या 60 धावांमध्ये लिटन दास एकटा 56 धावा करून खेळत होता. त्याचवेळी शांतो 4 धावा करून क्रीजवर परतला होता. बांगलादेशने दिलेल्या 185 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना शांतो आणि लिटन दास क्रीजवर आले असता भुवनेश्वर जोरदार आक्रमण केले. त्यानंतर बांगलादेश संघाची पळताभुई थोडी झाली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने 44 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी केली. बांगलादेशकडून हसन महमूदने 3 बळी मिळवले. त्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झालाय.

- Advertisement -

हेही वाचाः पाऊस थांबल्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात, बांगलादेशला मिळालं नवं टार्गेट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -