घरक्रीडापाऊस थांबल्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात, बांगलादेशला मिळालं नवं टार्गेट

पाऊस थांबल्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात, बांगलादेशला मिळालं नवं टार्गेट

Subscribe

टी-२० विश्वचषकातील चौथा सामना टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू आहे. दोन्ही संघासाठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करत १८५ धावांचं लक्ष बांगलादेशसमोर ठेवलं. परंतु एडिलेड येथे खेळल्या जाणाऱ्या पावसानं व्यत्यय आणलं आहे. बांगलादेशच्या संघानं ७ ओव्हर्समध्ये ७७ धावा केल्या होत्या. परंतु पाऊस पडल्यामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. मात्र, पाऊस थांबल्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरूवात करण्यात आली आहे. परंतु बांगलादेशला सुधारित टार्गेट देण्यात आलं असून टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बांगलादेशला मिळालं नवं टार्गेट

- Advertisement -

बांगलादेशला दिलेल्या नव्या टार्गेटनुसार १६ ओव्हर्समध्ये १५१ धावांची गरज आहे. बांगलादेशनं लिटन दासच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर ७ ओव्हर्समध्ये बिनबाद ६६ धावा केल्या. परंतु सध्याची स्थिती पाहिली असता २० चेंडूत ४३ धावांची गरज आहे.

- Advertisement -

विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतक केल्यामुळे टीम इंडियाला २० ओव्हर्समध्ये ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभारता आला. सूर्यकुमार यादवनंही ३० धावा केल्या. तर हार्दिक पंड्या (६), अक्षर पटेल (७), रोहित शर्मा (२) आणि दिनेश कार्तिक (7), अशा धावा करत त्यांनी फारसा प्रभाव पाडला नाही.मात्र, आता बांगलादेश प्रत्युतरात काय खेळी करणार हे पाहणं महत्वाचं आहे.


हेही वाचा : विराटचा कानमंत्र सार्थकी; के. एल. राहुलचे दमदार अर्धशतक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -