घरमहाराष्ट्रनाशिकघंटागाडी ठेकेदारासाठी पालिकेच्या पायघड्या; अटी-शर्तींचा भंग होऊनही कारवाई नाही

घंटागाडी ठेकेदारासाठी पालिकेच्या पायघड्या; अटी-शर्तींचा भंग होऊनही कारवाई नाही

Subscribe

पंचवटी : पंचवटी विभागातील एका खासगी मक्तेदारास नवीन दैनंदिन घनकचरा उचलण्याचे काम (घंटागाडी) मिळालेल्या निविदेच्या अटी शर्ती व नियमानुसार ९५ वाहने उपलब्ध करून देत नसल्यास व निविदाप्रमाणे अटी शर्तीचे नियमांचे पालन करत नसल्यास आजपासूनच दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच, दिलेली वर्क ऑर्डर आदेश तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पंचवटी विभागाकरिता दैनंदिन डोअर टू डोअर कचरा संकलनासाठी निविदेप्रमाणे ६० मोठी वाहने, छोट्या गल्ली-बोळासाठी १३ छोटी वाहने, गार्डन विभागासाठी १० मोठी वाहने, हॉटेल, लॉन्स व मंगल कार्यालयासाठी ६ मोठी वाहने, ब्लॅक स्पॉट्साठी ०६ मोठी वाहने अशा एकूण ९५ नवीन वाहनांची निविदा प्रसिद्ध झाली होती. परंतु, माजी नगरसेविका सौ. प्रियांका माने यांनी घेतलेल्या माहितीप्रमाणे पंचवटी विभागासाठी दैनंदिन डोअर टू डोअर कचरा संकलनासाठी या मक्तेदाराकडे छोट्या स्वरूपाची ग्रामीण भागात चालणारी, ज्यात केवळ ४०० ते ५०० किलो कचरा संकलनाची क्षमता असलेली छोटी वाहने संबंधित मक्तेदाराने आणलेली आहेत. पालिकेच्या प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या नियमानुसार छोट्या स्वरूपाचे फक्त १३ वाहने असताना संबंधित मक्तेदार हा दैनंदिन कचरा संकलनासाठी त्यापेक्षा जास्त वाहने छोट्या स्वरूपाची घेतलेली आहे.

- Advertisement -

पंचवटीतील प्रभागांची भौगोलिक परिस्थिती बघता प्रसिद्ध केलेल्या निविदाप्रमाणे ६० मोठ्या स्वरूपाची वाहने ज्या वाहनांमध्ये २००० ते २५०० हजार किलो म्हणजे दोन ते अडीच टन दैनंदिन डोअर टू डोअर कचरा संकलन करण्याची क्षमता असलेली मोठी वाहने मक्तेदाराने घेणे गरजेचे होते. मात्र, संबंधित मक्तेदाराने छोट्या स्वरूपाची १३ वाहने घेणे अपेक्षित असताना त्यापेक्षा जास्त वाहने घेतल्याचे माहिती मिळाली आहे. जर संबंधित मक्तेदाराने छोट्या वाहनांमार्फत डोअर टू डोअर कचरा संकलन केल्यास संपुर्ण घनकचरा उचलला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या रोषास लोकप्रतिनिधींना व त्या परिसरातील पालिका कर्मचारी यांना सामोरे जावे लागेल. यामुळे प्रसिद्धी केलेल्या निविदेच्या अटीशर्तीप्रमाणे नियमानुसार संबंधित मक्तेदारास दैनंदिन डोअर टू डोअर घनकचरा उचलण्याचे काम प्रसिद्ध केलेल्या निविदेचे संपूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

सदर ठेकेदारासोबत घनकचरा विभागातील अधिकार्‍यांची काही आर्थिक हितसंबंध, लागेबांधे असतील असे वाटते. ठेकेदाराकडून होणार्‍या नुकसानीची सर्व जबाबदारी ही घनकचरा विभागातील संबंधित अधिकारी यांची असेल. त्याविरोधात मी न्यायालयात जाईल. : प्रियांका माने, माजी नगरसेविका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -