घरक्रीडाश्रीलंका विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला 'मी बाकी खेळाडूंनाही...'

श्रीलंका विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी बाकी खेळाडूंनाही…’

Subscribe

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन आशिया चषकातील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठे वक्तव्य केले आहे.

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन आशिया चषकातील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठे वक्तव्य केले आहे. “एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात आपण कोणते फटके खेळायला हवेत, हे फलंदाजांना समजायलं हवं होतं”, अशा शब्दांत रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. तसेच, “भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात टी ट्वेन्टी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेकानेक खेळाडूंना संधी दिली जाणार असून त्यांना परफॉर्मन्स दाखवण्याची संधी असेल, अनेकांना आम्ही ट्राय करणार आहोत, असे मोठे वक्तव्य रोहित शर्मा याने केले आहे. (indian captain rohit sharma comment on t20 world cup)

पुढील महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेन्टी विश्वचषक करंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी आशिया चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, श्रीलंका विरोधातल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. ‘महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांनी दाखवलेला निष्काळजीपणावर बोट ठेवत कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यानंतर फलंदाजीबाबत नाराजी व्यक्त केली. एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात आपण कोणते फटके खेळायला हवेत, हे फलंदाजांना समजायला हवे होते, असे रोहित शर्मा म्हणाला.

- Advertisement -

“टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी आमचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंपैकी 95 टक्के हेच खेळाडू असू शकतात. त्यात कमीअधिक बदल होऊ शकतात. पण आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. जोपर्यंत टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होत नाही, तोपर्यंत आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विविध खेळाडूंना आजमावणार आहोत”, असेही रोहित शर्मा याने म्हटले.

“आम्ही खूप सारे सामने खेळतोय. लागोपाठ आम्ही चांगले रिझल्टही दिले आहेत. त्यामुळे आशिया चषकातील २ सामन्यांत झालेल्या पराभवानंतर लगेच चिंता करण्याची गोष्ट नाही. पण असे पराभव गरजेचे देखील असतात. यातून खूप काही शिकायला मिळते”, असेही रोहित शर्मा याने म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – तू घाबरू नकोस, ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे; सचिन तेंडुलकरचा अर्शदीप सिंहला सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -