घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाची आता खरी 'कसोटी'!

IND vs AUS : टीम इंडियाची आता खरी ‘कसोटी’!

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे-नाईट कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.  

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. विराट कोहलीच्या भारताने सुरुवातीला झालेली एकदिवसीय मालिका गमावली, पण त्यानंतर दमदार पुनरागमन करत टी-२० मालिका जिंकली. मात्र, बऱ्याच क्रिकेट जाणकारांच्या मते भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य अशा दोन संघांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. अ‍ॅडलेड येथील पहिला कसोटी सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार असून परदेशात डे-कसोटी खेळण्याची ही भारतीय संघाची पहिलीच वेळ असेल.

कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ बराच काळ डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास नकार देत होते. अखेर मागील वर्षी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे भारताने पहिली डे-नाईट कसोटी खेळली आणि जिंकली. या सामन्यात कर्णधार कोहलीने शतक झळकावत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून केवळ पहिल्या कसोटीत खेळणार आहे. त्यामुळे मायदेशी परतण्याआधी भारताला विजयी सुरुवात करून देण्याचे कोहलीचे लक्ष्य असेल.

- Advertisement -

डे-नाईट कसोटी सामना हा गुलाबी चेंडूने खेळला जातो. तिसऱ्या सत्रात रात्रीच्या वेळी गुलाबी चेंडू हा नेहमी वापरण्यात येणाऱ्या लाल चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो. त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे भारताचे तेज त्रिकुट या सामन्यात महत्वाची भूमिका बजावेल. भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. या मालिकेत फलंदाज चेतेश्वर पुजाराने उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारताला मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची असल्यास पुजारा, कोहली आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागणार आहे.


प्रतिस्पर्धी संघ (अंतिम ११) –

- Advertisement -

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.     

ऑस्ट्रेलिया (संभाव्य) : टीम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लबूशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, नेथन लायन.        

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून; थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्ट्स नेटवर्क 
 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -