Eco friendly bappa Competition
घर क्रीडा ‘डबल एक्सएल’ चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवनचं बॉलिवूड पदार्पण

‘डबल एक्सएल’ चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवनचं बॉलिवूड पदार्पण

Subscribe

या चित्रपटाची गोष्ट जाड, वजनदार महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉडी शेमिंगला सडेतोड उत्तर देताना दिसून येईल. चित्रपटामध्ये वजनला विनोदी अंदाजात दाखवण्यात आलं आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शिखर धवन बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘डबल एक्सएल’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकताच हा खुलासा अभिनेत्री हुमा कुरैशीने तिच्या इंस्टाग्राम वरुन पोस्ट शेअर करत केला आहे. शिखर धवन सोशल मीडियावर वारंवार आपले विविध गमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतो.

‘डबल एक्सएल’ची काय आहे कथा

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

- Advertisement -

‘डबल एक्सएल’ चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत असणार आहेत. जेव्हा या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाची गोष्ट जाड, वजनदार महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉडी शेमिंगला सडेतोड उत्तर देताना दिसून येईल. चित्रपटामध्ये वजनला विनोदी अंदाजात दाखवण्यात आलं आहे.

14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
‘डबल एक्सएल’ चित्रपटाचे शूटिंग मोठ्या प्रमाणात भारत आणि यूकेमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुना कुरैशीने 15 ते 20 किलो वजन वाढवलं आहे. सतराम रमानी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘डबल एक्सएल’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी व्यतिरिक्त जहीर इकबाल आणि महत राघवेन्द्र देखील दिसून येतील. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि जहीर इकबालचा एक म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या म्यूझिक व्हिडीओचं नाव ‘ब्लॉकबस्टर’ आहे. तसेच ‘डबल एक्सएल’चे निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, साकिब सलीम, हुमा कुरैशी हे करत आहेत.ॉ


- Advertisement -

हेही वाचा :

‘डबल एक्सएल’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -