Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'डबल एक्सएल' चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत

‘डबल एक्सएल’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत

Subscribe

'डबल एक्सएल' येत्या 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्या आगामी चित्रपटाती घोषणा करण्यात आली आहे. यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘डबल एक्सएल’ असून हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

‘डबल एक्सएल’ची काय आहे कथा
‘डबल एक्सएल’ चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत असणार आहेत. जेव्हा या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. आता या चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा दिसून येत आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची गोष्ट जाड, वजनदार महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉडी शेमिंगला सडेतोड उत्तर देताना दिसून येईल. चित्रपटामध्ये वजनला विनोदी अंदाजात दाखवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

- Advertisement -

सतराम रमानी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘डबल एक्सएल’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी व्यतिरिक्त जहीर इकबाल आणि महत राघवेन्द्र देखील दिसून येतील. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि जहीर इकबालचा एक म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या म्यूझिक व्हिडीओचं नाव ‘ब्लॉकबस्टर’ आहे. तसेच ‘डबल एक्सएल’चे निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, साकिब सलीम, हुमा कुरैशी हे करत आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘गुडबाय’ चित्रपटाला प्रेक्षकांची नापसंती; पहिल्या दिवशी कमावले केवळ इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -