घरक्रीडाभारतीय क्रिकेटपटूंना वेतनकपात नाही!

भारतीय क्रिकेटपटूंना वेतनकपात नाही!

Subscribe

बीसीसीआय खजिनदार धुमाळ यांची माहिती

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या बर्‍याच देशांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. बहुतांश खेळांच्या स्पर्धाही बंद आहेत. त्यामुळे क्रीडा संघटना आणि संघांना आर्थिक नुकसान होत आहे. युरोपमधील मोठमोठ्या आणि श्रीमंत फुटबॉल संघांनाही आपल्या खेळाडूंच्या वेतनात कपात करणे भाग पडले. करोनामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटच्या सर्व स्पर्धाही बंद आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याचा बीसीसीआयला आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र, असे असतानाही भारतीय क्रिकेटपटूंच्या वेतनात कपात होणार नसल्याचे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही खेळाडूंची वेतनकपात करण्याबाबत अजून चर्चाही केलेली नाही. आम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकेल, पण तरीही आम्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू अशी आशा आहे. यंदा आयपीएल न झाल्यास बीसीसीआयचा महसूल बराच कमी होईल यात शंका नाही. ती वेळ आल्यावरच आम्ही चर्चा करु. मात्र, सध्या तरी आमचा खेळाडूंच्या वेतनकपातीचा विचार नाही. तो आमचा सर्वात शेवटचा पर्याय असेल. परंतु, आम्हाला आता इतर खर्च कमी करावे लागणार आहेत. आम्ही कुठे पैशाची बचत करु शकतो याचा विचार करत आहोत. आम्ही करोना महामारीच्या आधीपासूनच याबाबत चर्चा करत आहोत. बीसीसीआयचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च कमी करण्याबाबतही आमचा विचार सुरु आहे. मात्र, खेळाडूंना याचा फटका बसणार नाही, असे धुमाळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -