घरक्रीडाDhyan Chand Award: चार महिन्यांपूर्वी सोडला देश, पुरस्कारासाठी भारतात परतले सुखविंदर सिंग

Dhyan Chand Award: चार महिन्यांपूर्वी सोडला देश, पुरस्कारासाठी भारतात परतले सुखविंदर सिंग

Subscribe

भारतीय संघातर्फे स्टॉपर बॅकच्या रूपात खेळणारे सुखविंदर सिंग यांची मागच्या वर्षी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली होती

भारतीय संघातर्फे स्टॉपर बॅकच्या रूपात खेळणारे सुखविंदर सिंग यांची मागच्या वर्षी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली होती. कोरोनामुळे या पुरस्काराच्या वितरणाला विलंब झाला होता. आईएम विजयन, जो पॉल अंचेरी आणि भाईचुंग भुतिया सारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने २००० साली इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक (coach) म्हणून सुखविंदर सिंग यांनी संघाचा कारभार सांभाळला होता. त्यांनी नुकत्याच ४ महिन्यापूर्वी भारत देश सोडला होता. ते कॅनडामध्ये त्यांच्या मुलाकडे राहण्यासाठी गेले होते. पण ध्यानचंद पुरस्काराची घोषणा झाल्याचे कळताच ते दिल्लीला आपल्या स्वखर्चाने दाखल झाले. सुखविंदर यांच्या माहितीनुसार हा पुरस्कार त्यांच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. या आठवणी कायम सोबत सोबत ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय संघासाठी स्टॉपर बॅकच्या रूपात खेळणाऱ्या सुखविंदर सिंग यांना मागील वर्षीच ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. पण कोरोनामुळे पुरस्काराचे वाटप करण्यात विलंब झाला. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या पुरस्काराचे वाटप एका साधारण कार्यक्रमाच्या स्वरूपात करण्यात आले. सुखविंदर सिंग हे जवळपास २० वर्षे प्रशिक्षक होते. त्यांचे फगवाडा मध्ये घर आहे. दिल्लीत १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जलतरणपटू सचिन नागला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -