घरट्रेंडिंगDiwali Muhurat Trading 2021: शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार ; मुहूर्त...

Diwali Muhurat Trading 2021: शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार ; मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान करु शकता विशेष खरेदी

Subscribe

या विशेष मुहूर्तावर खरेदी करून बंपर नफा मिळवू शकता.

शेअर बाजार या आठवड्यात दोन दिवस बंद राहणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर दिवाळीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. बीएसईच्या स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. मात्र, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ४ नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. अशा परिस्थितीत या विशेष मुहूर्तावर खरेदी करून बंपर नफा मिळवू शकता.

‘या’ दिवशीही शेअर बाजार बंद असणार

या दोन दिवसांव्यतिरिक्त १९ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार आहे. मात्र, दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार केवळ एक तासच उघडणार आहे. दिवाळीच्या दिवशी हा मुहूर्त ट्रेडिंग आहे. या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असली तरी, मुहूर्त साधण्यासाठी बाजारात केवळ १ तासच व्यवहार होतो. या एका तासात गुंतवणूकदार कमी-जास्त प्रमाणात गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात.

- Advertisement -

काय आहे मुहूर्त ट्रेंडिंगचा वेळ ?

शेअर बाजारामध्ये ४ नोव्हेंबर २०२१ या दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता एका तासासाठी १५ मिनिटांचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग असेल. एक्स्चेंजच्या मते, दिवाळीच्या मुहूर्ताचे ट्रेडिंग हे संध्याकाळी ६ :00 ते ६ : 08 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर संध्याकाळी ६ : १५ ते ७ : १५ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल. यामध्ये गुंतवणूकदार पैज लावू शकतात.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय ?

नवीन वर्षाची सुरुवात ही शेअर बाजारात दिवाळीने होते. याशिवाय यावेळी संवत २०७७ ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार, देशातील अनेक भागांमध्ये दिवाळी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करते. बाजार बंद असला या दिवशी खास मुहूर्तावर बाजार उघडला जातो, त्यामुळे शेअर बाजारातील व्यापारी या शुभ मुहूर्तावर विशेष शेअर ट्रेडिंग करतात. यात अनेकजण बंपर कमाई करु शकतात त्यामुळे याला मुहूर्त ट्रेडिंग, असे देखील म्हणतात.

- Advertisement -

हे ही वाचा – Vaccination : राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीकरण १०० टक्के करा, मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -