Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : KKR ची गाडी अखेर रुळावर येणार? आज पंजाब किंग्सशी टक्कर

IPL 2021 : KKR ची गाडी अखेर रुळावर येणार? आज पंजाब किंग्सशी टक्कर

कोलकाताला आतापर्यंत पाच पैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश आले आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने संपले असून दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात सामने मुंबई आणि चेन्नई येथे झाले. मात्र, कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आजचा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. कोलकाताला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले असून हा संघ विजयाच्या शोधात आहे. कोलकाताला आतापर्यंत पाच पैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश आले आहे. कोलकाताला त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभूत केले होते. त्या सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांनी निराशा केली होती.

राहुल त्रिपाठी सलामीला?

कोलकाताचे फलंदाज यंदा चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. खासकरून शुभमन गिल आणि नितीश राणा या सलामीवीरांना आक्रमक फलंदाजी करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोलकाता आजच्या सामन्यात राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवत राणाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवू शकेल. तसेच कोलकातासाठी कर्णधार मॉर्गनचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. त्याने कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांना अखेरच्या षटकांत फटकेबाजी करणे सोपे होईल.

पंजाबच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी

- Advertisement -

पंजाब किंग्सचा संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक असले. सलग तीन पराभवांनंतर पंजाबने आपल्या मागील सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत मुंबईला कमी धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि क्रिस गेल यांनी संयमाने खेळ करत पंजाबला विजय मिळवून दिला. त्यामुळे आता वेगळ्या मैदानावर पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

- Advertisement -