घरक्रीडाIPL 2021 : मोसम सुरु होण्यापूर्वी बऱ्याच खेळाडूंनी दिलेला कोरोना लस घ्यायला...

IPL 2021 : मोसम सुरु होण्यापूर्वी बऱ्याच खेळाडूंनी दिलेला कोरोना लस घ्यायला नकार!

Subscribe

यंदाचा मोसम सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा फ्रेंचायझीसचा विचार होता.

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. या स्थगितीला आता जवळपास दोन आठवडे होत आले असतानाही आयपीएल आणि कोरोनाचा परिणाम खेळाडूंवर दिसून येत आहे. सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज प्रसिध कृष्णा कोरोनाची बाधा झाल्याने अजूनही घरीच क्वारंटाईन आहे. आयपीएलच्या आयोजनातील चुका, तसेच यंदा ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यास दिलेला नकार बीसीसीआयला महागात पडला आहे. त्यातच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना लसीकरणाबाबत योग्य माहिती देण्यातही बीसीसीआय व बहुतांश फ्रेंचायझीस अपयशी ठरल्याची माहिती आता एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

खेळाडूंना बहुधा पूर्ण माहिती नाही 

आयपीएलचा यंदाचा मोसम सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा फ्रेंचायझीसचा विचार होता. मात्र, या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच खेळाडूंनी लस घेण्यासाठी नकार दिला होता. ‘खेळाडूंना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत विचारणा झाली होती. मात्र, बऱ्याच खेळाडूंचा त्यासाठी नकार होता. त्यात त्यांची चूक आहे असे म्हणता येणार नाही. त्यांना बहुधा पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती,’ असे या वृत्तपत्राला सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

परदेशी खेळाडू होते तयार 

बायो-बबलमध्ये राहणार असल्याने आपण सुरक्षित वातावरणात आहोत आणि आपल्याला लस घेण्याची आवश्यकता नाही, असे खेळाडूंना वाटले होते. काही फ्रेंचायझीसनी खेळाडूंना लस घेण्यासाठी तयार केले. परंतु, बहुतांश फ्रेंचायझी त्यात अपयशी ठरल्याचेही सांगण्यात आले. परदेशी खेळाडू लसीकरणासाठी तयार होते, पण त्यांना भारतात केवळ भारतीय नागरिकांनाच लस उपलब्ध असल्याने परदेशी खेळाडूंना लस देणे शक्य झाले नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -