घरक्रीडाIPL 2021 : पृथ्वी-धवनची फटकेबाजी; दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी

IPL 2021 : पृथ्वी-धवनची फटकेबाजी; दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी

Subscribe

पृथ्वीने ७२ आणि धवनने ८५ धावांची खेळी केली. 

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामीवीरांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर ७ विकेट राखून मात केली. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि धवन यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी १३.३ षटकांत १३८ धावांची सलामी दिली. पृथ्वीने अवघ्या २७ चेंडूत, तर धवनने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ड्वेन ब्रावोने पृथ्वीला बाद करत ही जोडी फोडली. पृथ्वीने ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. तर धवनने ५४ चेंडूत ८५ धावा केल्यावर त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. परंतु, कर्णधार रिषभ पंत (नाबाद १५) आणि मार्कस स्टोईनिसने (१४) दिल्लीला विजय मिळवून दिला.

सुरेश रैनाचे अर्धशतक

त्याआधी दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. फॅफ डू प्लेसिस (०) आणि ऋतुराज गायकवाड (५) लवकर माघारी परतले. मात्र, मोईन अली (३६) आणि सुरेश रैना (५४) यांनी ५३ धावांची भागीदारी रचत चेन्नईचा डाव सावरला. तसेच अंबाती रायडू (२३), रविंद्र जाडेजा (नाबाद ३६) आणि सॅम करन (३४) यांनी चांगली फलंदाजी केल्याने चेन्नईने २० षटकांत ७ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -