घरक्रीडाIPL 2021 : हेटमायरची फटकेबाजी वाया; दिल्लीविरुद्ध RCB एका धावेने विजयी 

IPL 2021 : हेटमायरची फटकेबाजी वाया; दिल्लीविरुद्ध RCB एका धावेने विजयी 

Subscribe

दिल्लीला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना पंत केवळ चौकार मारू शकला.

शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार रिषभ पंत यांच्या अर्धशतकांनंतरही दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्लीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अवघ्या एका धावेने पराभूत केले. हा बंगळुरूचा सहा सामन्यांत पाचवा विजय ठरला. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना शिखर धवन (६) आणि स्टिव्ह स्मिथ (४) झटपट बाद झाले. तसेच पृथ्वी शॉ (२१) आणि मार्कस स्टोईनिस (२२) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मात्र, पंत (४८ चेंडूत नाबाद ५८) आणि हेटमायर (२५ चेंडूत नाबाद ५३) यांनी दिल्लीला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना पंत केवळ चौकार मारू शकला.

डिव्हिलियर्सच्या नाबाद ७५ धावा

त्याआधी या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (१२) आणि देवदत्त पडिक्कल (१७) हे लवकर बाद झाले. यानंतर रजत पाटीदार (३१) आणि ग्लेन मॅक्सवेल (२५) यांनी बंगळुरूला सावरले. हे दोघे बाद झाल्यावर एबी डिव्हिलियर्सने बंगळुरूच्या डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे बंगळुरूने २० षटकांत ५ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -