घरक्रीडाIPL 2021 : चेन्नईची खेळपट्टी अत्यंत वाईट; हैदराबादच्या खेळाडूची टीका

IPL 2021 : चेन्नईची खेळपट्टी अत्यंत वाईट; हैदराबादच्या खेळाडूची टीका

Subscribe

चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करणे अवघड जात आहे.

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आतापर्यंत मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम या दोनच मैदानांवर सामने झाले आहेत. वानखेडेची खेळपट्टी फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल असून मोठ्या धावसंख्या होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी मात्र वानखेडेच्या अगदी विरुद्ध आहे. चेन्नईच्या संथ खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत असून फलंदाजांना धावा करणे अवघड जात आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टीका केली आहे.

क्युरेटरची चूक नाही

अगदी खरे सांगायचे तर चेन्नईची खेळपट्टी अत्यंत निराशाजनक आहे. टीव्हीवरसुद्धा ही खेळपट्टी वाईट दिसते. मात्र, यात क्युरेटरची (खेळपट्टी बनवणारे) चूक नाही. मागील काही महिन्यांत या खेळपट्टीवर खूप सामने झाले असून सतत खेळपट्टी चांगल्या स्थितीत ठेवणे अवघड आहे. मात्र, क्युरेटर त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना श्रेय मिळाले पाहिजे. चेन्नईमध्ये धावा करणे नेहमीच अवघड असते. परंतु, क्युरेटर या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही, असे वॉर्नर म्हणाला.

- Advertisement -

केवळ एकदा २०० धावा पार

चेन्नईत झालेल्या आतापर्यंतच्या आठ सामन्यांत केवळ एका संघाला २०० धावांचा टप्पा पार करता आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाताविरुद्ध २०४ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेल (७८) आणि एबी डिव्हिलियर्स (नाबाद ७६) यांनी फटकेबाजी केली होती. २०५ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला केवळ १६६ धावा करता आल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -