IPL 2022: ‘हा’ गोलंदाज भारतीय संघात बुमराहला देऊ शकतो टक्कर

आयपीएलनंतर जसप्रीत बुमराह भरातीय संघात खेळत आहे. मात्र आता बुमराहला मागे टाकेल असा गोलंदाज भारतीय संघाला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजी करत आहे.

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून भारतीय संघाला अनेक उत्कृष्ट खेळाडू प्राप्त झाले आहेत. २०१३ सालच्या आयपीएलमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पदापर्ण केलं होतं. त्यावेळी बुमराह आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्या आयपीएलनंतर जसप्रीत बुमराह भरातीय संघात खेळत आहे. मात्र आता बुमराहला मागे टाकेल असा गोलंदाज भारतीय संघाला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजी करत आहे. या खेळाडूचे नाव आवेश खान असं आहे.

आवेश खान हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स या नव्या संघातून खेळत आहे. काल लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामाना झाला. या सामन्यात आवेश खानने जबरदस्त बोलंदाजी केली. आवेश खाननं ४ षटकात २४ धावा देत ४ बळी घेतले. विशेष म्हणजे आवेशनं हैद्राबादच्या संघातील मुख्य खेळाडूंना तंबुत धाडलं. केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, निकोलस पूरन आणि अब्दुल समद या फलंदाजांना आवेशनं बाद केलं. या सामन्यात आवेशला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आलं.

आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आवेश खान दुसऱ्या स्थानवर आहे. आवेश या पर्वात आतापर्यंत ७ गडी बाद केलेत. तसंच, जलद गोलंदाज उमेश यादव या यादीत पहिल्या स्थानावर आहे. उमेशनं आतापर्यंत ८ गडी बाद केले आहेत. पंजाब किंग्जचा राहूल चहर हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत ६ गडी बाद केले आहेत.

यंदाच्या सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रथम येण्यासाठी आवेशला एका विकेटची गरज आहे. आवेश खाननं आतापर्यंत २८ आयपीएल सामन्यात २३.४४ च्या सरासरीनं ३६ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलचा कालचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं १२ धावांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. यावेळी लकनऊचा कर्णधार लोकेश राहुल (६८) आणि दीपक हुडा (५१) यांनी अर्धशतकी खेळी केली.


हेही वाचा – राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळेल; सौरव गांगुलीला विश्वास