घरक्रीडाIPL 2022 : 6,1,6,6,6! राशिदची तुफानी फटकेबाजी, अखेरच्या षटकात गुजरातचा हैदराबादवर विजय

IPL 2022 : 6,1,6,6,6! राशिदची तुफानी फटकेबाजी, अखेरच्या षटकात गुजरातचा हैदराबादवर विजय

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वातील कालचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात अतीतटीची लढत पाहायला मिळाली. राशिद खान आणि राहुल तेवातिया यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने अखेरच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वातील कालचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात अतीतटीची लढत पाहायला मिळाली. राशिद खान आणि राहुल तेवातिया यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने अखेरच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला.

या सामन्याच्या अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 35 धावांची गरज असताना गुजरातने हैदराबादवर विजय मिळवला. नटराजनने टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये राहुल तेवातियाने एक सिक्स आणि एक फोर मारली. त्यामुळे हैदराबादने या ओव्हरला 13 धावा काढल्या. अखेरच्या ओव्हरला हैदराबादला विजयासाठी 22 धावांची गरज होती, तेव्हा राशिद खानने मार्को जेनसनच्या पहिल्या बॉलला सिक्स मारल्यानंतर तेवातियाने दुसऱ्या बॉलला एक रन काढून राशिद खानला स्ट्राईक दिला. यानंतर राशिदने तिसऱ्या आणि पाचव्या बॉलला सिक्स मारली, त्यामुळे गुजरातला अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. यानंतर अखेरच्या बॉलवर राशिदने पुन्हा एक सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरला विजयासाठी 22 धावा हव्या असताना गुजरातने 25 धावा काढल्या.

- Advertisement -

हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. ऋद्धीमान साहाने 38 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 22 रनची खेळी करून साहाला साथ दिली. राहुल तेवातियाने 21 बॉलमध्ये नाबाद 40 आणि राशिद खानने 21 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. हैदराबादकडून उमरान मलिकने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 5 विकेट घेतल्या, या 5 पैकी 4 बॅटर बोल्ड झाले. उमरान मलिकशिवाय हैदराबादच्या इतर कोणत्याच बॉलरला विकेट मिळाली नाही.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 195/6 पर्यंत मजल मारली. शशांक सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनवर आक्रमण केलं. शशांक सिंगने 416.67 च्या स्ट्राईक रेटने 6 बॉलमध्ये 25 धावा केल्या. यात 3 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. अभिषेक शर्माने 42 बॉलमध्ये 65 आणि एडन मार्करमने 40 बॉलमध्ये 56 धावांची महत्त्वाची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, यश दयाळ आणि अल्झारी जोसेफला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

- Advertisement -

हैदराबादविरुद्धच्या या विजयासह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोसमात गुजरातने 8 पैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर हैदराबादची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.


हेही वाचा – IPL 2022: ‘या’ पाच युवा भारतीय गोलंदाजांपुढे सर्वच फलंदाज ठरतायत निष्प्रभ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -