घरक्रीडाठरलं! आयपीएलचा लिलाव 'या' तारखेला होणार; 991 खेळाडूंवर लागणार बोली

ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार; 991 खेळाडूंवर लागणार बोली

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या २०२३ मधील सिझनसाठी केरळामधील कोची येथे बोली लागणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी दिली.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या २०२३ मधील सिझनसाठी केरळामधील कोची येथे बोली लागणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी दिली. ७१४ भारतीय खेळाडू आणि २७७ परदेशी खेळाडू अशा ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. पुढच्या वेळीही १० संघांचा समावेश आयपीएलमध्ये असेल. (Ipl 2023 Auction To Be Held On December 23rd At Kochi Kerala List Of 991 Registered Players)

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात ९९१ नोंदणीकृत खेळाडूंवर बोली लागणार आहे. यंदाच्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व आहे. तिथल्या ५७ खेळाडूंनी लिलावासाठी साइन अप केले आहे. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका (५२), वेस्ट इंडिज (३३) आणि इंग्लंड ३१) या देशांचा क्रमांक लागतो. दरम्यान, या लिलावासाठी भारतातील १९ कॅप्ड खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दहा आयपीएल फ्रँचायझींनी न घेतलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२३ लिलाव

  • कॅप्ड भारतीय खेळाडू – १९
  • कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू – १६६
  • संलंग्न देशांचे खेळाडू – २०
  • मागच्या हंगामाचा भाग असलेले अनकॅप्ड भारतीय खेळाडू – ९१
  • मागच्या हंगामाचा भाग असलेले अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू – ३
  • अनकॅप्ड भारतीय खेळाडू – ६०४
  • अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू – ८८

लिलावात सहभागी होणाऱ्या १४ देशांचे २७७ खेळाडू

- Advertisement -
  • अफगणिस्तान – १४
  • ऑस्ट्रेलिया – ५७
  • इंग्लंड – ३१
  • बांगलादेश – ६
  • आयर्लंड – ८
  • नामिबिया – ५
  • नेदरलॅंड्स – ७
  • न्यूझीलंड – २७
  • स्कॉटलंड – २
  • दक्षिण आफ्रिका – ५२
  • श्रीलंका – २३
  • संयुक्त अरब अमिरात – ६
  • वेस्ट इंडिज – ३३
  • झिम्बाब्वे – ६

लिलावासाठी उर्वरित रक्कम

  • चेन्नई सुपरकिंग्ज २०.४५ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स : १९.४५ कोटी
  • गुजरात टायटन्स : १९.२५ कोटी
  • कोलकाता नाईट रायडर्स : ७.०५ कोटी
  • लखनौ सुपर जायंट्स : २३.३५ कोटी
  • मुंबई इंडियन्स : २०.५५ कोटी
  • पंजाब किंग्स – ३२.२० कोटी
  • राजस्थान रॉयल्स : १३.२० कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : ८.७५ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद : ४२.२५ कोटी

हेही वाचा – AUS vs WI Test Match : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी; ‘या’ खेळाडूंला टाकलं मागे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -