घरक्रीडाTravis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर...

Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

Subscribe

सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे आता तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करणार चौथा फलंदाज ठरला आहे. 

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे आता तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करणार चौथा फलंदाज ठरला आहे. (IPL 2024 SRH VS RCB Travis Head 4th player to score fastest century)

बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मात्र त्यांचा हा निर्णय कुठेतरी चुकल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचे आयपीएलमध्येही त्याचे दमदार प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या बंगळुरू संघाविरुद्ध त्याने सुरुवातीला 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले तर त्यानंतर 39व्या चेंडूवर आयपीएलचे पहिले शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 41 चेंडूत 102 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 248.78 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 8 षटकार मारले.

- Advertisement -

हेही वाचा – SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात हेडने त्याचा साथीदार अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 8.1 षटकात 108 धावांची भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर चांगली फलंदाजी करणारा अभिषेक बाद झाला आणि त्याने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या.

- Advertisement -

हैदराबाद गोलंदाजांची लाइन-लेंथ बिघडवली

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने आजही दमदार प्रदर्शन केले. बंगळुरूचा फिरकीपटू विल जॅकने सामन्याच्या पहिल्याच षटकात सात धावा दिल्या, मात्र त्यानंतर आरसीबीचा स्ट्राइक बॉलर रीस टोपलीला डावाच्या दुसऱ्या षटकात 20 धावा दिल्या. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने डावाच्या पाचव्या षटकात 18 धावा दिल्या. तर सहाव्या षटकात यश दयालनेही 20 धावा दिल्या. त्यामुळे पॉवरप्लेमध्येच हैदराबादने एकही विकेट न गमावता 76 धावा केल्या होत्या. यानंतर दोन्ही फलंदाजांनी अवघ्या 7.1 षटकांत 100 धावा केल्या.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक मारणारे फलंदाज (Fastest century scorer in IPL)

30 चेंडू – ख्रिस गेल
37- युसूफ पठाण
38 – डेव्हिड मिलर
39 – ट्रॅव्हिस हेड
42 – ॲडम गिलख्रिस्ट
42- एबी डिव्हिलियर्स
45 – सनथ जयसूर्या

ट्रॅव्हिस हेड कारकिर्द

ट्रॅव्हिस हेडने 2016 मध्ये आयपीएलमध्ये एट्री केली आणि 2017 मध्ये पहिला सामना खेळला. मात्र त्यानंतर त्याला कोणत्याही संघाने लीगमधअये आपल्या संघाचा भाग बनवले नाही. असे असतानाही 2024 च्या लिलावात हैदराबाद संघाने त्याला संधी दिली आणि तो आता मिळालेल्या संधीचे सोने करताना दिसत आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -