घरक्रीडाISSF World Championships : १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय महिलांची चमक

ISSF World Championships : १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय महिलांची चमक

Subscribe

भारताच्या नेमबाजपटूंनी आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली असून भारताची नेमबाजपटू इलावनिल व्हॅलेरिव्हन हीने  रौप्यपदक तर श्रेया अगरवालने कांस्यपदक मिळवून दिलं आहे.

भारताच्या जूनियर महिलांनी अप्रतिम कामगिरी केली असून एकाच स्पर्धेत भारताला रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदकं मिळवून दिली आहेत. साउथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पार पडलेल्या १० मी. एअर रायफल वूमन ज्यूनियर नेमबाजी प्रकारात भारताची नेमबाजपटू इलावनिल व्हॅलेरिव्हन हीने  रौप्यपदक तर श्रेया अगरवाल हिने कांस्यपदक मिळवून दिलं आहे. याआधी सकाळीच १० मी. एअर रायफल मेन ज्यूनियर नेमबाजी प्रकारात ह्रदय हजारिकाही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

वाचा – ISSF World Championships : नेमबाजपटू ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक

भारताचा डबल धमाका

भारताच्या महिलांनी  १० मी. एअर रायफल वूमन ज्यूनियर नेमबाजी प्रकारात अप्रतिम कामगिरी करत रौप्यपदकासह कांस्यपदकही भारताला मिळवून दिलं आहे. पात्रता फेरी पार करत भारताच्या दोन खेळाडू इलावनिल आणि श्रेया या अंतिम सामन्यात पोहोचल्या आणि त्यांनी अप्रतिम कामगिरी करत दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. तर चायनाच्या मेन्गआओ शी हीने पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.

- Advertisement -

क्रिडामंत्री राज्यवर्धन यांनीही केले अभिनंदन

भारताच्या महिला नेमबाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीला सर्वच स्तरातून कौतुक होत असताना भारताचे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करत रौप्यपदक विजेत्या इलावनिलचे  अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -