घरक्रीडा'या' क्रिकेटरने बॅटवर लिहिली शिवी! जाहीर केले कारण

‘या’ क्रिकेटरने बॅटवर लिहिली शिवी! जाहीर केले कारण

Subscribe

इंग्लंडचा प्रसिद्ध विकेटकीपर आणि बॅट्समन जोस बटलर आजवर नेहमीच त्याच्या खेळामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे जोरदार चर्चेत आहे. बटलरने त्याच्या बॅटवर चक्क एक शिवी लिहिली आहे. याचाच फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. त्यामुळे बटलर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्दायवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

काय लिहिलंय बॅटवर?

बटलरने त्याच्या बॅटवर नेमकं असं लिहिलंय तरी काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोनुसार त्याने आपल्या बॅटवर F**K IT असे शब्द लिहिले आहेत. ही बॅट ग्राउंडवर ठेवली असताना, एका कॅमेरामनने हा फोटो काढला. कॅमेरा झूम करुन पाहताना त्याला बॅटवर लिहिलेले ‘ते’ शब्द दिसले आणि क्षणातच त्याने ते कॅमेऱ्यात टिपले.

- Advertisement -

‘या’ कारणासाठी लिहिला होता तो संदेश

 

बटलने त्याच्या बॅटवर अशा प्रकारचा संदेश का बरं लिहिला असेल? यावर लोकांनी विविध प्रकारची मतं नोंदवली आहेत. मात्र, याचा नेमका खुलासा बटलरने स्वत:च केला आहे. बटलरच्या म्हणण्यानुसार, त्याने हे शब्द स्वत:ला प्रेरित करण्यासाठी लिहिले आहेत. बटलर सांगतो की ”हे शब्द मला माझ्या चांगल्या मानसिकतेची जाणीव करुन देण्यासाठी आहेत. हे शब्द मला क्रिकेटमध्ये अजून खूप कामगिरी करायची आहे, याची जाणीव करुन देतात. खेळाच्या तणावातून बाहेर काढण्यासाठी हे शब्द मला मदत करतात. हे शब्द मला जाणवून देतात की मला कोणाच्या दबावाखाली न येता, स्वतंत्रपणे खेळायचे आहे.” एका वेबसाईटशी बोलत असताना बटलने हे स्पष्टीकरण दिलं.

इंग्लडचा विकेटकीपर आणि बॅट्समन – जॉस बटलर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -