घरक्रीडामेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम

मेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम

Subscribe

ला लिगा फुटबॉल स्पर्धा

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने मायोर्काविरुद्धच्या सामन्यात स्पेनमधील स्पर्धा ला लिगात आपल्या ३५ व्या हॅटट्रिकची नोंद केली. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक हॅटट्रिक करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. या सामन्याआधी मेस्सी आणि रियाल माद्रिदचा माजी खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो या दोघांनीही ला लिगामध्ये ३४ हॅटट्रिक केल्या होत्या. रोनाल्डो सध्या इटालियन संघ ज्युव्हेंटसकडून खेळतो. मेस्सीने मागील सोमवारी रोनाल्डोवरच मात करत विक्रमी सहाव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला होता.

मेस्सीच्या हॅटट्रिकमुळे बार्सिलोनाने आरसीडी मायोर्का संघावर ५-२ अशी मात केली. मेस्सीने या सामन्याच्या १७, ४१ आणि ८३ व्या मिनिटाला गोल केले. बार्सिलोनाचे इतर दोन गोल अँटोन ग्रीझमान आणि लुईस सुआरेझने केले. हा बार्सिलोनाचा १५ सामन्यांतील अकरावा विजय होता. त्यामुळे ३४ गुणांसह ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. बार्सिलोनाप्रमाणेच रियाल माद्रिदच्या खात्यातही ३४ गुण आहेत. त्यांनी राफेल वरान आणि करीम बेंझमाच्या गोलमुळे एस्पानियॉल संघाचा २-० असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -