घरक्रीडामांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब 'अजिंक्य'; एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा पराभव

मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब ‘अजिंक्य’; एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा पराभव

Subscribe

डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी धाव घेत मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा तब्बल पाच विकेट्सनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी धाव घेत मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा तब्बल पाच विकेट्सनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सेंट्रल मैदानावर रंगलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत चिन्मय सुतारच्या धडाकेबाज ७३ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने २० षटकात ८ बाद १६४ धावा अशी मजल मारली.

सिध्दांत सिंगनं ३१ आणि शशिकांत कदमने ३६ धावा केल्या. प्रथमेश डाकेने जबाबदारीपूर्ण गोलंदाजी करताना १७ धावांत सहा फलंदाजांना बाद केले. चेतन पाटील आणि रोनिथ रमेशने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करताना कुणकेश पाटील, सुशांत टिळक आणि शिवकुमार चौहानने चिवट फलंदाजी करत संघाला विजयाच्या नजीक नेले. पण एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली.

- Advertisement -

पण मांडवी मुस्लिमच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत शेवटच्या षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १६५ धावांनिशी विजेतेपद निश्चित केले. कुणकेशने ६०, सुशांतने ४४ आणि शिवकुमारने ३३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. नंदन कामतने ४१ धावांत ३ आणि शशिकांत कामतने एक विकेट मिळवली.

प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने २० षटकात ८ बाद १६४ धावा केल्या. यावेळी एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघाकडून चिन्मय सुतार (७३) धावा, सिध्दांत सिंग (३१) धावा, शशिकांत कदम (३६) धावा केल्या. तसंच, या संघाच्या गोलंदाजांपैकी प्रथमेश डाके यानं उत्तम गोलंदाजी केली. प्रथमेशनं ४ षटकांत १७ धावा देत ६ गडी बाद केले. चेतन पाटील यानं ३ षटकात २९ धावा देत १ गडी बाद केला. रोनिथ रमेश याने १ षटक टाकत २ धाव देत १ गडी बाद केला.

- Advertisement -

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने दिलेल्या आव्हाना पाठलाग मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने सहज केला. मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने १९.५ षटकात ५ बाद १६५ धावा केल्या. या संघाकडून कुणकेश पाटील याने ६० धावा केल्या. सुशांत टिळक याने ४४ धावा केल्या आणि शिवकुमार चौहान याने ३३ धावा केल्या. तसंच, या संघातून नंदन कामत याने ४ षटकात ४१ धावा देत ३ गडी बाद केले. शशिकांत कदम याने ३.५ षटकात ३९ धावा देत १ गडी बाद केला.


हेही वाचा – IPL 2022: पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -