Youth Olympic Games 2018 : मनू भाकरची सुवर्ण कमाई

युथ ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कमावले.

सौ - Indianexpress

ब्यूनोस एयर्स येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कमावले. युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. एकाच दिवशी भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यआधी वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदक मिळवले होते.

२३६.५ गुणांसह सुवर्णपदक 

मनू भाकरने नेमबाजीच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कमावले. त्यामुळे युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. मनूने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २३६.५ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. रशियाच्या लाना एनिना हिने २३५.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले. मनू ही भारताची सर्वोत्तम युवा महिला नेमबाज म्हणून ओळखली जाते. मनूने यावर्षी झालेल्या नेमबाजी विश्वचषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.