घरमनोरंजनहसता हसता रडू येतं; सोनालीची भावनिक पोस्ट

हसता हसता रडू येतं; सोनालीची भावनिक पोस्ट

Subscribe

अभिनेत्री सोनालीने पुन्हा एकदा भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने उपचारादरम्यान झालेल्या त्रासाचा अनुभव मांडला आहे.

कर्करोगासारख्या आजाराशी लढणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने पुन्हा एकदा भावून संदेश देत तिच्या चाहत्यांना हळवे केले आहे. आपल्या आजाराबाबत उघडपणे सांगणारी सोनाली खरतर किती त्रासात आहे, हे तिच्या या पोस्टमधून समजते. सोनाली बेंद्रे हिने तिच्या ट्विटर हॅंडलवर स्वतःचा एक फोटो शेअर केला असून सोबत एक नोट दिली आहे. यामध्ये तिने आपण कसे स्वतःला आजाराशी लढण्याकरता बळ देत असून होणाऱ्या त्रासात स्वतःचा सांभाळ करत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मला कोणीही संपवू शकत नाही 

सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर देखील तिच पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने लिहीले आहे की, मला माहिती आहे, जर भीतीला मी माझ्या वरचढ होऊ दिले तर माझा आजाराच्या काळातील प्रवास अधिकच त्रासदायक होईल. भीती नेहमीच अशा गोष्टीपासून निर्माण होते, जी आपण स्वतः सांगतो. पण मी एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट बनवण्याचे निश्चित केले आहे. मी निर्णय घेतला आहे की, मी सुरक्षित आहे, मी कणखर आहे, मी निडर आहे, मला कोणीही संपवू शकत नाही – (चेरिल स्ट्रेयड वाइड या प्रसिद्ध लेखिकेचा कोट आहे).

उपचारादरम्यानचा अनुभव सांगितला 

यानंतर सोनाली कशा पद्धतीने आपण चांगल्या आणि वाईट काळाला सामोरे गेलो, याबाबत सांगितले आहे. तिने लिहीले आहे की, “असाही एक काळ होता, जेव्हा मला शारीरिकदृष्ट्या खुप कमकुवत वाटत होते, थकवा जाणवायचा, एक बोट उचलण्याचीही माझ्यात क्षमता नव्हती. खुप त्रास होत होता. बरेचदा हे चर्क सुरु राहायचे जे शारीरिक त्रासापासून सुरु होऊन मानसिक आणि नंतर भावनिक त्रासापर्यंत येत होते. प्रामुख्याने कीमोथेरेपी आणि सर्जरीच्या दरम्यान हा अनुभव घेतला आहे. इतकेच नव्हे तर हसतानाही त्रास होत होता.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -