घरक्रीडायुथ ऑलिम्पिकसाठी मनू भाकर ध्वजवाहक

युथ ऑलिम्पिकसाठी मनू भाकर ध्वजवाहक

Subscribe

अर्जेन्टिनामध्ये होणाऱ्या तिसऱ्या युथ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यासाठी नेमबाज मनू भाकरची ध्वजवाहक म्हणून निवड झाली आहे.

अर्जेन्टिनामध्ये होणाऱ्या तिसऱ्या युथ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यासाठी नेमबाज मनू भाकरची ध्वजवाहक म्हणून निवड झाली आहे. तिसरे युथ ऑलिम्पिक ६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत अर्जेन्टिनाची राजधानी ब्यूनोस एयर्स येथे होणार आहे. या स्पर्धेत भारताचे ४६ खेळाडू १३ विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेणार आहेत.

हा मान मिळेल अशी अपेक्षा नव्हती

मनू भाकर ध्वजवाहक म्हणून निवड होण्याबाबत म्हणाली, “भारतीय संघाची ध्वजवाहक म्हणून निवड झाल्याचा मला खूप अभिमान आहे. मला हा मान मिळेल अशी अपेक्षा नव्हती.” मनू भाकर ही भारतातील सर्वोत्तम नेमबाजांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने २०१८ नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २ सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्यामुळे या स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

देशासाठी पदके जिंकून याला याची खात्री

भारताचे क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड हे या खेळाडूंना निरोप देतानाच्या कार्यक्रमात म्हणाले, “मला माहित आहेत की तुम्ही खेळाडू देशासाठी पदके जिंकून याला. आता ते दिवस गेले जेव्हा भारत फक्त घ्यायचा म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -