घरक्रीडाMI vs CSK Live Updates: चेन्नईने अखेरच्या षटकात सामना जिंकला

MI vs CSK Live Updates: चेन्नईने अखेरच्या षटकात सामना जिंकला

Subscribe

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्यापासून सुरुवात होत आहे.  

रायडूनंतर आलेल्या रवींद्र जडेजाने आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ५ बॉलमध्ये १० रन्स करुन तो क्रुणाल पांड्याचा शिकार ठरला. त्यानंतर आलेल्या सॅम करनने ४ बॉलमध्ये १२ रन्स केले आहेत. सध्या चेन्नईला १२ बॉलमध्ये १६ रन्स हवेत.


४८ बॉल्समध्ये ७१ रन्सची धडाकेबाज फटकेबाजी करुन चेन्नईचा अंबाती रायडू आऊट झाला आहे. राहुल चहरच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्याच्या नादात रायडू आऊट झाला. राहुल चहरनेच त्याची कॅच पकडून त्याला माघारी धाडले


  • अंबाती रायडूने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएल स्पर्धेतील १९ वे अर्धशतक ठरले.

    - Advertisement -


  • पहिल्या दोन षटकांत दोन विकेट गमावल्यानंतर अंबाती रायडू आणि फॅफ डू प्लेसिसने मिळून चेन्नईला सावरले. दहा षटकांनंतर चेन्नईची २ बाद ७० अशी धावसंख्या. त्यांना जिंकण्यासाठी ६० चेंडूत आणखी ९३ धावांची गरज. 

  • वॉटसन पाठोपाठ चेन्नईचा दुसरा सलामीवीर मुरली विजयही (१) स्वस्तात बाद झाला. त्याला जेम्स पॅटिन्सनने डावाच्या दुसऱ्या षटकात पायचीत पकडले.

  • १६३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने सलामीवीर शेन वॉटसनला ४ धावांवर बाद केले.

  • आयपीएल २०२० च्या सलामीच्या लढतीत मुंबईने २० षटकांत९ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली आणि चेन्नईपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवले. 

  • तिवारी पाठोपाठ हार्दिक पांड्याही (१४) बाद झाला. पांड्याला जाडेजानेच बाद केले आणि पुन्हा एकदा डू प्लेसिसने त्याचा उत्कृष्ट झेल पकडला.


  • सौरभ तिवारीचे अर्धशतक हुकले. ४२ धावांवर त्याला रविंद्र जाडेजाने बाद केले. फॅफ डू प्लेसिसने त्याचा उत्कृष्ट झेल पकडला.

  • दीपक चहरने सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. सूर्यकुमारने १६ चेंडूत १७ धावा केल्या.

  • मुंबईचे सलामीवीर रोहित (१२) आणि डी कॉक (३३) चांगल्या सुरुवातीनंतर सलग दोन षटकांत माघारी परतले. रोहितला पियुष चावला, तर डी कॉकला सॅम करनने बाद केले. मुंबईची ६ षटकांनंतर धावसंख्या २ बाद ५१.

  • मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि डी कॉकची दमदार सुरुवात. पहिल्याच षटकात मुंबई बिनबाद १२. रोहितने पहिल्याच चेंडूवर मारला चौकार.

  • जेम्स पॅटिन्सन मुंबई इंडियन्सकडून, तर सॅम करन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार पहिला सामना.

    - Advertisement -


  • क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन आणि ट्रेंट बोल्ट हे असणार मुंबईचे चार परदेशी खेळाडू.

     


  • चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 


  • चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. धोनीने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. 

  • सलामीच्या लढतीत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. 

  • आयपीएल स्पर्धेच्या तेराव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदाचा मोसम युएईमध्ये पार पडणार आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -