Milkha Singh Death : ‘तुम्ही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहाल’; सचिन, गांगुलीने वाहिली मिल्खा सिंग यांना आदरांजली

एशियाड आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा हे भारताचे एकमेव खेळाडू आहेत.

milkha singh
मिल्खा सिंग यांचे निधन

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मिल्खा यांना मागील महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना चंदीगड येथील पीजीआयएमई रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आले होते. तसेच त्यांचा कोरोनाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘वडिलांचे निधन झाले,’ अशी माहिती त्यांचा मुलगा आणि महान गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिली.

मिल्खा सिंग हे भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू मानले जातात. एशियाड आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते अजूनही भारताचे एकमेव खेळाडू आहेत. १९६० रोम ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक ही मिल्खा यांची त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच त्यांनी १९५६ आणि १९६४ ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे शुक्रवारी निधन झाल्याचे कळल्यावर भारताच्या आजी-माजी क्रीडापटूंनी त्यांना आदरांजली वाहिली.

तुम्ही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहाल – सचिन तेंडुलकर

भारतीय युवकांनी खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहिले – गांगुली

‘मिल्खा’ हे नाव अजरामर आहे – सेहवाग  

हिरो, प्रेरणा, महान खेळाडू – बुमराह