घरक्रीडाशिवमुद्रा , शिवनेरी उपउपांत्य फेरीत दाखल

शिवमुद्रा , शिवनेरी उपउपांत्य फेरीत दाखल

Subscribe

मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या किशोर गटात शिवमुद्रा प्रतिष्ठान, शिवनेरी मंडळ, वीर संताजी मंडळ, गोल्फादेवी सेवा, सिद्धीप्रभा फाऊंडेशन, अमर संदेश स्पोर्ट्स, एस. एस. जी. फाऊंडेशन, बंड्या मारुती सेवा यांनी उपउपांत्य फेरीत धडक दिली. नायगाव, मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने जय दत्तगुरु कबड्डी संघाचा प्रतिकार ३९-३५ असा संपुष्टात आणला.

तर शिवनेरी क्रीडा मंडळाने स्वयंस्वराज क्रीडा मंडळाला ४५-२६ असे नमवित आगेकूच केली. वीर संताजी क्रीडा मंडळाने वीर बजरंग कबड्डी संघाचा ७६-१४ असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. गोल्फादेवी सेवा मंडळाने एच. जी. एस. क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ५९-५६ असे मोडून काढत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सिद्धीप्रभा फौंडेशनने श्री राम क्रीडा विश्वस्तचा ५५-२० असा सहज पाडाव केला. ३३-०९ अशी विश्रांतीला आघाडी घेणार्‍या सिद्धीप्रभाच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते आकाश मोरे, रविराज तावरे. श्रीरामचा सौरभ माळी एकाकी लढला.

- Advertisement -

अमर संदेश स्पोर्ट्सने अत्यंत चुरशीच्या लढतीत वारसलेन क्रीडा मंडळाला ५१-४३ असे नमवित उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही डावात चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतराला २६-२०अशी महत्वपूर्ण आघाडी अमर संदेशकडे होती. एस. एस. जी. फाऊंडेशनने शताब्दी स्पोर्ट्सवर ५७-२३ अशी मात करीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. जितेंद्र यादव, दीपेश गवळी या विजयाचे शिल्पकार ठरले. बंड्या मारुती सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळावर ४५-१६ असा विजय प्राप्त करीत आगेकूच केली. आदित्य धरकरी, हर्ष पोटे बंड्या मारुतीकडून, तर स्वप्नील पवार, आकाश जाधव आकांक्षाकडून उत्कृष्ट खेळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -