घरक्रीडाIPL 2023 : मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी? जाणून घ्या संघाचे वेळापत्रक

IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी? जाणून घ्या संघाचे वेळापत्रक

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 16वे पर्व सुरू होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विशेष लक्ष मुंबई इंडियन्सच्या संघावर असणार आहे. कारण मागील पर्वात गुणतालिकेत सर्वात शेवटी मुंबईचा संघ होता.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 16वे पर्व सुरू होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विशेष लक्ष मुंबई इंडियन्सच्या संघावर असणार आहे. कारण मागील पर्वात गुणतालिकेत सर्वात शेवटी मुंबईचा संघ होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आयपीएलचे जेतेपद पटकावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांची माहिती जाणून घेऊयात… (mumbai indians team players list and mi match schedule in ipl 2023)

मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यन्त ५ वेळा जेतेपद जिंकण्याचा इतिहास आयपीएलमध्ये घडवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल.

- Advertisement -

मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • MI vs RCB – २ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, बँगलोर
  • MI vs CSK – ८ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
  • MI vs DC – ११ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, दिल्ली
  • MI vs KKR – १६ एप्रिल २०२३, दुपारी ३:३० वाजता, मुंबई
  • MI vs SRH – १८ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
  • MI vs PBKS – २२ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
  • MI vs GT – २५ एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
  • MI vs RR – ३० एप्रिल २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
  • MI vs PBKS – ३ मे २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मोहाली
  • MI vs CSK – ६ मे २०२३, दुपारी ३:३० वाजता, चेन्नई
  • MI vs RCB – ९ मे २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
  • MI vs GT – १२ मे २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
  • MI vs LSG – १६ मे २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता, लखनऊ
  • MI vs SRH – २१ मे २०२३, दुपारी ३:३० वाजता, मुंबई

मुंबई इंडियन्स कोचिंग स्टाफ

- Advertisement -
  • मार्क बाउचर (मुख्य प्रशिक्षक)
  • किरॉन पोलार्ड (फलंदाजी प्रशिक्षक)
  • शेन बाँड (गोलंदाजी प्रशिक्षक)
  • जेम्स पॅमेंट (फिल्डिंग प्रशिक्षक)

मुंबई इंडियन्स संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ , आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.


हेही वाचा – IPL 2023 : उद्यापासून IPLचा थरार ; गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज येणार आमनेसामने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -