घरक्रीडानीरजचा भाला थेट 'सुवर्ण'वर...क्लास वन नोकरी अन् कोट्यवधींच्या बक्षिसांचा पाऊस

नीरजचा भाला थेट ‘सुवर्ण’वर…क्लास वन नोकरी अन् कोट्यवधींच्या बक्षिसांचा पाऊस

Subscribe

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात दुसर्‍या वैयक्तिक सुवर्णपदकाची नोंद झाली. नीरजच्या सुवर्ण कामगिरीनंतर त्याच्यावर बक्षिसांचा पाऊस पाडण्यात आला आहे. नीरजला हरयाणा सरकारने ६ कोटींचं बक्षिस जाहीर करत क्लास वन नोकरी देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

नीरज चोप्राला हरयाणा सरकारने ६ कोटी रुपये आणि क्लास वन नोकरी देण्याचं जाहीर केलं. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत. नीरजची इच्छा असल्यास आम्ही या केंद्रावर त्याची प्रमुख म्हणून नियुक्ती करू. तसेच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच ५० टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल, अशी घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली. नीरज हा हरयाणातील पानिपतचा रहिवासी आहे.

- Advertisement -

- Advertisement -

हरयाणा सरकारसोबत पंजाब सरकारने देखील नीरजसाठी बक्षिस जाहीर केलं. पंजाब सरकारने नीरजसाठी २ कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे. तर बीसीसीआयकडून १ कोटीचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -