Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा सचिनच्या फॅमिलीत Spike ची एंट्री

सचिनच्या फॅमिलीत Spike ची एंट्री

स्पाइकला आपल्या दोन्ही हातात पकडलेला एक फोटो सचिनने सोशल मीडियावर शेअर केलाय. सचिनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Related Story

- Advertisement -

क्रिकेटर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) सध्या क्रीडा विश्वापासून दूर असला तरी तो सोशल मीडियावर बराच सक्रीय आहे. सोशल मीडियावर सचिनचे मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सचिन सोशल मीडियावर दररोज तो अपडेट त्याच्या चाहत्यासोबत शेअर करत असतो. नुकताच सचिनने सोशल मीडियावरुन त्याच्या फॅमिलीत नव्याने एंट्री झालेल्या पाहुण्याचा फोटो शेअर करत त्याची सर्व नेटकऱ्यांना ओळख करुन दिलीय. हा पाहुणा आहे सचिनच्या घरी आलेला नवा श्वान स्पाइक. (New Dog named Spike’s entry into Sachin Tendulkar family)  सचिनने नुकतेच श्वानाचे पिल्लू घेतले असून त्याचे नाव स्पाइक (Spike) असे ठेवले आहे. स्पाइकला आपल्या दोन्ही हातात पकडलेला एक फोटो सचिनने सोशल मीडियावर शेअर केलाय. सचिनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

- Advertisement -

‘माझा नवा पार्टनर स्पाइक आज सोशल मीडियावर एंट्री करत आहे’, असे म्हणत सचिनने स्पाइक सोबतचा क्यूट फोटो शेअर केला. या फोटोत स्पाइक सचिनच्या हातात शांतपणे बसून कॅमेरात पाहताना दिसत आहे. सचिननेही स्पाइकला जवळ घेत क्यूट स्माइल केलीय. सचिन आणि स्पाइकचा हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सचिन तेंडूलकरला प्राण्यांविषयी प्रेम असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अनेक वेळा सचिनला मांजर आणि पक्षांसोबत खेळताना स्पॉट करण्यात आलेय. काही वर्षांपूर्वी सचिनचा एका जखमी मांजरीला फिडींग करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडिओतून सचिनचे प्राणी प्रेम दिसून आले होते. सचिन नेहमी त्याच्या चाहत्यांना प्राण्यांना मदत करण्याचे आवाहन करत असतो. स्पाइक सोबतच्या फोटोतून सचिनचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Tokyo Olympics : दोन ज्युडोपटूंची ऑलिम्पिकमधून माघार; ‘या’ खेळाडूविरुद्ध खेळावे लागू नये म्हणून घेतला निर्णय

- Advertisement -