घरक्रीडाFrench Open 2020 : नोवाक जोकोविचची विजयी घोडदौड; उपांत्य फेरीत प्रवेश 

French Open 2020 : नोवाक जोकोविचची विजयी घोडदौड; उपांत्य फेरीत प्रवेश 

Subscribe

जोकोविचने याआधी २०१६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.   

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्ताला चार सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यादरम्यान त्याचा डाव हात दुखावला. परंतु, या दुखापतीवर त्याने मात करत उपांत्य फेरी गाठली. या फेरीत त्याचा ग्रीसच्या पाचव्या सीडेड स्टेफानोस त्सीत्सीपासशी सामना होईल. त्सीत्सीपासने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या आंद्रेय रुबलेव्हचा ७-५, ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

दहाव्यांदा गाठली उपांत्य फेरी 

अव्वल सीडेड जोकोविचला मात्र उपांत्यपूर्व फेरीमध्ये १७ व्या सीडेड पाब्लो कारेनो बुस्ताने चांगली झुंज दिली. या सामन्याचा पहिला सेट बुस्ताने ६-४ असा जिंकला. मात्र, जोकोविचने दमदार पुनरागमन करत यापुढील सलग तीन सेट ६-२, ६-३, ६-४ असे जिंकत हा सामनाही जिंकला. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची जोकोविचची ही तब्बल ३८ वी वेळ होती. तर त्याने दहाव्यांदा फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने याआधी २०१६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

- Advertisement -

सुरुवातीला खराब खेळ

‘हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. मला खूप संयमाने खेळ करावा लागला. बुस्ता फारच चांगला खेळाडू आहे आणि तो फारशा चुका करत नाही. त्यामुळे मला प्रत्येक गुणासाठी मेहनत करावी लागली. सामन्याच्या सुरुवातीला मी खराब खेळ केला. मात्र, त्यानंतर मला लय सापडली आणि माझा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच मी सामना जिंकू शकलो,’ असे सामन्यानंतर जोकोविच म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -