घरदेश-विदेशराष्ट्रवादी बिहार निवडणूक लढवणार; स्टार प्रचारकांची यादी जाहीर, शरद पवार मुख्य प्रचारक

राष्ट्रवादी बिहार निवडणूक लढवणार; स्टार प्रचारकांची यादी जाहीर, शरद पवार मुख्य प्रचारक

Subscribe

बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून बिहार विधानसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. या निवडणुकीसाठी शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे मुख्य स्टार प्रचारक असणार आहेत, अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करतील. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडीला सोबत घेण्याची इच्छा नाही, शिवाय शिवसेनेसोबत देखील जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्य प्रचारक असतील. महाराष्ट्रातील सत्तापालटात शरद पावारांचा मोठा हात आहे. शरद पावारांची जादू आता बिहारमध्ये दिसणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

ncp

- Advertisement -

स्टार प्रचारकांची यादी

  • खासदार प्रफुल पटेल
  • खासदार सुनिल तटकरे
  • के. के. शर्मा
  • खासदार सुप्रियाताई सुळे
  • राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक
  • राजीव झा, नरेंद्र वर्मा
  • राजेंद्र जैन
  • सच्चिदानंद सिंग
  • ब्रिजमोहन श्रीवास्तव
  • के. जे. जोसेमन
  • फौजिया खान
  • धीरज शर्मा
  • सोनिया दुहान
  • शब्बीर विद्रोही
  • पुष्पेंद्र मलिक
  • सीमा मलिक
  • विरेंद्र सिंग
  • गोविंदभाई परमार
  • वेदपाल चौधरी
  • उमाशंकर यादव
  • एस. पी. शर्मा
  • मुरलीमनोहर पांडे
  • नवलकिशोर साही
  • राहत काद्री
  • जितेंद्र पासवान
  • ललिता सिंग
  • संजय केशरी
  • इस्तियाक आलम
  • अकबर अली
  • मनोज जैस्वाल
  • खुशारो आफ्रीदी
  • ब्रिजबिहारी मिश्रा
  • शकील अहमद
  • अझर आलम
  • इंदू सिंग
  • चांदबाबू रहेमान
  • चंद्रेश कुमार
  • चंद्रशेखर सिंग

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -