घरक्रीडाPAK vs ZIM 2021 : पाकचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी अर्धवट...

PAK vs ZIM 2021 : पाकचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी अर्धवट सोडला झिम्बाब्वे दौरा; ‘हे’ ठरले कारण

Subscribe

वकार यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्येही पाकिस्तान संघ मध्येच सोडला होता.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी झिम्बाब्वे दौरा सोडून जाण्याच्या निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली. आता पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र, या मालिकांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांना वकार युनिस यांचे मार्गदर्शन लाभणार नाही. वकार यांनी झिम्बाब्वे दौरा सोडून आपल्या घरी सिडनी, ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. वकार यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घेतली.

तात्काळ निघण्याचा निर्णय

वकार यांच्या पत्नीवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांनी झिम्बाब्वे दौरा सोडून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ हरारेहून निघण्याचा निर्णय घेतला आहे, असे पाकिस्तानच्या व्यवस्थापनकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

याआधी संघ मध्येच सोडला 

वकार यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्येही कौटुंबिक कारणास्तव पाकिस्तान संघ मध्येच सोडला होता. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या कसोटी सामन्याआधी वकार यांनी संघाला सोडून आपल्या घरी ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार होते. मात्र, क्वारंटाईनचे ८ दिवस पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये परत यावे लागले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -