घरक्रीडाPAK vs WI : पाकिस्तान-वेस्टइंडीज सामन्यांच्या सुरक्षेसाठी कराचीत ८८९ कमांडोंची फौज

PAK vs WI : पाकिस्तान-वेस्टइंडीज सामन्यांच्या सुरक्षेसाठी कराचीत ८८९ कमांडोंची फौज

Subscribe

पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमध्ये १३ डिसेंबरपासून ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे

पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमध्ये १३ डिसेंबरपासून ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही मालिका पाकिस्तानच्या धरतीवर पार पडणार आहे त्यामुळे दोन्हीही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी योजना आखण्यात आली आहे. दरम्यान मालिकेच्या पूर्वसंध्येलाच कराची पोलिसांनी कराचीच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू होणाऱ्या मालिकांतील सामन्यांसाठी सुरक्षेची योजना तयार केली आहे. याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. सिंध बॉईज स्काउट्स सभागृहात महानिरीक्षक इमरान याकूब मिन्हास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही योजना तयार करण्यात आली आहे. या बैठकीत डीआयजी सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा विभाग मकसूद अहमद यांनी दौऱ्यासाठी कडक सुरक्षा आणि उपाययोजना असल्याची माहिती दिली.

दरम्यान मालिकेतील सामन्यांच्या सुरक्षेसाठी १३ वरिष्ठ पोलिस अधिकारी, ३१५ गैर सरकारी संस्था, ३८२२ कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल, ५० महिला पोलिस कर्मचारी, रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचे ५०० जवान आणि ८८९ कमांडोसह एकूण ४६ पोलिस उपअधिक्षक हे सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असतील. माहितीनुसार कराची ट्रॅफिक पोलिसही सर्व स्थरावर उपस्थित असतील.

- Advertisement -

तर विशेष शाखांच्या अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मैदान आणि हॉटेलमध्ये तैनात केले जाईल. या सोबतच आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष टीम देखील तयार असणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी वेस्टइंडीजचा संघ

शाई होप (कर्णधार), निकोलस पूरन, डारेन ब्राव्हो, शमराह ब्रूक्स, रोस्टन चेज, जस्टिन ग्रीव्स, अकिल हुसैन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, अँडरसन फिलीप, रेमन रेफर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेव्हॉन थॉमस, हेडन वॉल्श जूनियर.

- Advertisement -

टी-२० मालिकेसाठी वेस्टइंडीजचा संघ

निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप, डारेन ब्राव्हो, रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल, अकिल हुसैन, ब्रेंडन किंग, कायल मेयर्स, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस, हेडन वाल्श ज्युनियर,


हे ही वाचा: http://Ashes 1st Test 3rd day : मलान-रूटच्या अर्धशतकांनी इंग्लंडचा डाव सावरला; इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियापेक्षा ५८ धावांनी पिछाडीवर


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -