पैराकैनो वर्ल्ड कपमध्ये भारताने रचला इतिहास, पॅरालिंपिक एथलिट प्राची यादवची कांस्य कमाई

Paralympic athlete Prachi Yadav wins bronze in Paracano World Cup
पैराकैनो वर्ल्ड कपमध्ये भारताने रचला इतिहास, पॅरालिंपिक एथलिट प्राची यादवची कांस्य कमाई

पैराकैनो वर्ल्ड कपमध्ये भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेमध्ये भारताने पहिल्यांदाच कांस्य पदक पटकावले आहे. पैरा कैनो एथलीट प्राची यादवने पोलंडच्या पोंजनानमध्ये सुरु असलेल्या पैराकैनो वर्ल्ड कपच्या महिला वीएल २०० मीटर स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. हे पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला एथलिट बनून नवा इतिहास रचला आहे. प्राचीने 1.04.71 वेळेत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय.

पैरा कैनो एथलीट प्राची यादव पैराकैनो वर्ल्ड कपमधील कॅनडाची सिल्व्हर मेडलिस्ट ब्रियाना हेनेसी आणि गोल्ड मेडलिस्ट ऑस्ट्रेलियाची सुजना सेपेलच्या मागे राहिली. भारताकडून २६ मे पासून ते रविवारपर्यंतच्या स्पर्धेतील प्राची यादवने दाखवलेले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होते.

पुरुष गटाचा अंतिम सामन्यात प्रवेश

एथलिट प्राची यादवच्या चमकदार कामगिरीनंतर पुरुषांनीसुद्धा चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या इतिहासात पुरुषांनीसुद्धा पहिल्यांदा अंतिम सामन्यात धडक दिली आहे. मनीष कौरव (केएल पुरुष 200 मीटर) आणि मंजीत सिंह (वीएल2 पुरुष 200 मीटर) यांनी आपल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक पोहोचले आहे. असं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. जयदीपने वीएल ३ पुरुष २०० मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी क्वालीफाय केले होते. परंतु त्यांचा प्रवास इथेच थांबला आहे.


हेही वाचा : Champions League 2022 : रिअल मॅड्रिड 14 व्यांदा चॅम्पियन, लिवपूरलचा 1-0 ने पराभव