घरक्रीडाPCB : मोदींनी ठरवले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टाळा लागेल - रमीज...

PCB : मोदींनी ठरवले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टाळा लागेल – रमीज राजा

Subscribe
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमेन रमीज राजा यांनी मान्य केले आहे की, भारताशिवाय पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला काही किंमत नाही. एका बैठकीत त्यांनी सांगितले जर भारताने आईसीसीच्या फंडाची रक्कम थांबवली तर पाकिस्तानचे  क्रिकेट देखील संपुष्टात येईल. न्यूजीलैंड आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानने खूप आगपाखड केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि माजी क्रिकेट समालोचक रमीज राजा हेदेखील चर्चेत आले होते. आता रमीज राजा अजून एका वक्तव्यामुळे चर्चेत आले असून ते वक्तव्य त्यांनी भारताला अनुसरून केले आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख यांनी नुकत्याच एका बैठकीत जे काही वक्तव्य केलं त्याला पचवणे पाकिस्तानसाठी कठीण होईल, पण तेच खरे वास्तव सत्य आहे.

मोदींनी ठरवल पाकिस्तान बोर्डच संपुष्टात आणतील 

रमीज राजा यांनी त्या बैठकीत एका गोष्टीकडे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आईसीसी (ICC) फंडापेक्षा जास्त आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ५० टक्के आईसीसीच्या फंडावर चालत आहे. त्यातच आईसीसीकडे ९० टक्के फंडिग भारताकडून येत असते. मला भिती वाटते जर भारताने आईसीसीला फंडिग देणे बंद केले, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. म्हणजेच राजा यांनी एक प्रकारे स्पष्ट केले आहे की भारत नसेल तर पाकिस्तान पूर्णपणे रस्त्यावर येऊ शकतो.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमेनने सांगितले की, आम्ही शून्य टक्के फंडिग आयसीसीला देतो. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहे. एका अधिकाऱ्याने तर अस देखील सांगितलं जर पाकिस्तानने येणाऱ्या टी ट्वेंटी विश्वकपात भारताचा पराभव केला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक तयार ब्लैंक चेक मिळणार आहे. राजा यांनी सांगितले जर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिकदृष्ट्या मजबूत असता, तर न्यूजीलैंड आणि इंग्लंड सारखे संघ पाकिस्तान सोबतच्या मालिका सोडून गेले नसते.

मैदानावर बदला घेऊ

रमीज यांनी सांगितले जर आमची क्रिकेट इकोनॉमी मजबूत असती, तर आमचा असा वापर केला नसता. तसेच इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघानी आम्हाला अशी वागणुक दिली नसती. एक चांगला संघ उभारणे आणि चांगली इकोनॉमी उभारणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्ता पर्यंत आमच्या निशाण्यावर फक्त भारतीय संघ होता आता त्यात आणखी दोन संघाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघानी दौरा रद्द केल्याचा बदला आम्ही याचा बदला मैदानावर घेऊ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -