घरक्रीडादिल्लीतील प्रदूषण क्रिकेट सामान्यापेक्षा गंभीर विषय!

दिल्लीतील प्रदूषण क्रिकेट सामान्यापेक्षा गंभीर विषय!

Subscribe

दिल्लीतील वातावरण सध्या प्रदूषित असल्याने भारत आणि बांगलादेश यांच्यातील दिल्ली येथे होणारा पहिला टी-२० सामना इतरत्र हलवण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र पर्यावरणतज्ज्ञांनी मंगळवारी बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीला पाठवले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीकर गौतम गंभीरनेही या विषयावर भाष्य केले आहे. दिल्लीकरांनी क्रिकेट सामना आयोजित करण्यापेक्षा प्रदूषण कसे कमी होईल याचा विचार केला पाहिजे, असे विधान गंभीरने केले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना ३ नोव्हेंबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्लीतील प्रदूषण हा क्रिकेट सामना किंवा कोणत्याही खेळातील सामान्यापेक्षा गंभीर विषय आहे. त्यामुळे दिल्लीत राहणार्‍या लोकांनी क्रिकेट सामना होणार की नाही, यापेक्षा प्रदूषण कसे कमी होईल याचा विचार केला पाहिजे. प्रदूषणाचा परिणाम केवळ खेळाडूंवरच नाही, तर दिल्लीतील सामान्य माणसांवरही होतो. क्रिकेट सामना हा खूपच छोटा विषय आहे. सामना दिल्लीत होतो की इतरत्र कुठे, याने फारसा फरक पडत नाही, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्याने पुढे सांगितले, प्रदूषणाचा परिणाम दिल्लीतील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवरच होत आहे. आता आधीपेक्षा प्रदूषण कमी झाले आहे आणि याचे श्रेय दिल्लीतील लोकांना जाते. मात्र, त्यांना अजून बरेच काम करायचे आहे. क्रिकेट सामना होतो की नाही, याचा मी विचार करत नाही. मात्र, हा सामना दिल्लीतच होईल अशी मला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -