घरक्रीडाFrench Open 2022 : राफेल नदालने घडवला इतिहास, कॅस्पर रुडचा पराभव करत...

French Open 2022 : राफेल नदालने घडवला इतिहास, कॅस्पर रुडचा पराभव करत २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

Subscribe

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) फ्रेंच ओपन २०२२ (French Open 2022)च्या पुरूष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. नदालने रविवारी तब्बल १४ व्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली असून त्याने इतिहास घडवला आहे. ३६ वर्षीय नदालने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत २२ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली आहे. फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवण्याची ही त्याची १४ वी वेळ आहे.

नदालने आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनीच या जेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे फ्रेंच स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याचा विक्रम नदालच्या नावावर आहे. त्याचसोबतच स्विझर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी प्रत्येकी २० विजेतेपद पटकावली आहेत. दोन तास १८ मिनिटे चालेल्या या लढतीत नदालने एकतर्फी विजय मिळवला आहे.

- Advertisement -

नदालने २००५मध्ये वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२० मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. नदालने आतापर्यंत एकदाही फ्रेंच ओपनची अंतिम लढत हातातून गमावली नाहीये. ही स्पर्धा क्ले कोर्टवर खेळली जाते यामुळेच नदालला क्ले कोर्टचा राजा म्हटले जाते.

- Advertisement -

हेही वाचा : Toronto Masters : दुखापतीमुळे राफेल नदालची माघार; मेदवेदेव्हचा दुसऱ्या फेरीत प्रवेश


१८ वर्षांच्या कालावधीत नदालने १४ वेळा रोलँड गॅरॉसच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. नदालने गेल्या काही वर्षांत विविध दुखापतींना सोसले आहे. विशेषत: डाव्या पायाच्या दुखापतीमुळे त्याच्या यंदाच्या स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह होते. मात्र, या दुखापतींना मागे सारत त्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली.

दरम्यान, ५० वर्षांपूर्वी आंद्रे गिमेनो यांनी ३४व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. आता नदालने त्यांचा विक्रम मोडला. नदालने या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद जिंकले होते.


हेही वाचा : Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -