घरक्रीडाकोहली-शास्त्रीसमोर निवड समिती निष्प्रभ - किरमाणी

कोहली-शास्त्रीसमोर निवड समिती निष्प्रभ – किरमाणी

Subscribe

सध्याची निवड समिती कोहली-शास्त्री यांच्या तुलनेत कमी अनुभवी असल्याने ते त्यांच्या निर्णयांना आव्हान देण्यास असक्षम असल्याचे मत भारताचे माजी क्रिकेटर सय्यद किरमाणी यांचे आहे.

भारताचे निवड समिती सदस्य कमी अनुभवी असल्याने ते कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमोर बोलण्यास किंवा त्यांच्या निर्णयांना आव्हान देण्यास असक्षम असल्याचे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे.

रवी शास्त्रीच मुख्य निवडकर्ता

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी करूण नायर आणि मुरली विजय यांना भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. या दोघांनी निवड समितीने संघातून वगळण्याआधी आपल्याशी चर्चा केली नाही असे विधान केले होते. तर निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी नायर आणि विजय यांना संघातून वगळण्याआधी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे म्हटले होते. भारतीय संघाच्या निवडीबाबत बोलताना किरमाणी म्हणाले, “मला विचाराल तर रवी शास्त्री प्रशिक्षक असल्याने तो मुख्य निवडकर्ता आहे. तो, कर्णधार कोहली आणि संघातील काही अनुभवी खेळाडू हे निवड समितीपुढे काही नावे ठेवत असतील. सध्याची निवड समिती कोहली-शास्त्री यांच्या तुलनेत कमी अनुभवी आहे. त्यामुळे त्यांना कोहली-शास्त्रीचे ऐकावे लागते. ते कोहली-शास्त्री यांच्यासमोर बोलण्यास किंवा त्यांच्या निर्णयांना आव्हान देण्यास असक्षम आहेत.”
सय्यद किरमाणी (सौ-MidDay)

पंतला यष्टिरक्षण सुधारण्याची गरज

माजी यष्टीरक्षक असणाऱ्या किरमाणी यांनी सध्याचा यष्टीरक्षक रिषभ पंतविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले, “हल्ली कोणताही प्रशिक्षक तंत्राविषयी बोलत नाही याची मला खंत आहे. पंतचे फलंदाजी आणि यष्टिरक्षण याचे तंत्र जरा वेगळे आहे. फलंदाजीत जरी तुम्ही तंत्रशुद्ध नसाल तरी चालून जाते. मात्र, यष्टिरक्षणाचे तसे नाही. खासकरून फिरकी गोलंदाजांना यष्टिरक्षण करत असताना तुम्ही कधी उभे राहता यावर तुम्ही किती चांगले यष्टीरक्षक आहात हे कळते. पंतला यष्टिरक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -