घरक्रीडाबजरंग पुनियाची खेलरत्नसाठी शिफारस

बजरंग पुनियाची खेलरत्नसाठी शिफारस

Subscribe

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या नावाची यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षांत सातत्याने दमदार कामगिरी केल्यामुळे बजरंगची खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून शिफारस करण्यात आली. मागील वर्षी हा पुरस्कार न मिळाल्याने नाराज झालेला बजरंग कोर्टात धाव घेणार होता. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे.

बजरंग हा सध्याच्या घडीला भारताचा सर्वोत्तम कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो. बजरंगने नुकत्याच झालेल्या तबिलिसी ग्रां. प्रीमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. ६५ किलो वजनी गटात खेळणार्‍या बजरंगने मागील वर्षी जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच त्याला राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळाले होते. या त्याच्या दमदार कामगिरीमुळेच १२ सदस्यीय निवड समितीने बजरंगच्या नावाला बिनविरोध पसंती दर्शवली आहे. या समितीत माजी फुटबॉलपटू बायचूंग भूतिया, बॉक्सर मेरी कोम यांचा समावेश आहे.

- Advertisement -

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याविषयी बजरंगने सांगितले, पुरस्कार मिळणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, माझे लक्ष फक्त सर्वोत्तम कामगिरी करण्यावर असते. तुम्ही जर मेहनत घेत चांगले प्रदर्शन करत असाल, तर तुम्हाला त्याचे फळ मिळतेच. हा पुरस्कार मिळण्यासाठी मी योग्य ती कामगिरी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -