घरक्रीडास्टार टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त; पुढील आठवड्यात खेळणार अखेरची स्पर्धा

स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त; पुढील आठवड्यात खेळणार अखेरची स्पर्धा

Subscribe

स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकताच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयामुळे सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.

स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकताच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयामुळे सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. (Roger Federer announces retirement from tennis after stellar career)

ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररने निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. रॉजर फेडरर पुढील आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कपमध्ये शेवटची टेनिस स्पर्धा खेळणार आहे. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर यादरम्यान लेव्हर कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनंतर टेनिस कोर्टवर रॉजर फेडरर दिसणार नाही.

- Advertisement -

दरम्यान, फेडररने ट्विट केलेल्या मेसेजला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, त्याचे टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

रॉजर फेडरर हा सध्याच्या युगातला टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याने 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता. तसेच, तब्बल 237 आठवडे सलग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सर्वाधिक आठवडे रँकिंगमध्ये टॉपवर राहण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावर आहे.

- Advertisement -

सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे. रॉजर फेडरर हा आपल्या शैलीदार टेनिस फटक्यांसाठी प्रसिद्ध होता. आपल्या सहजतेने मारलेल्या बॅकहँड फटक्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अवाक करायचा. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

याशिवाय, 6 ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन टायटल (2009), आठ विम्बल्डन म्हणजेच 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017 तर 5 युएस ओपन म्हणजेच 2004, 2005, 2006, 2007, 2008 यावेळी ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.


हेही वाचा – ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्यापूर्वी प्रेक्षकांना बसणार धक्का…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -