घरक्रीडारोहित शर्माच्या १०००० धावा पूर्ण, सचिन-धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

रोहित शर्माच्या १०००० धावा पूर्ण, सचिन-धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

Subscribe

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामनयात कर्णधार रोहित शर्माने 17 चेंडूत 30 धावा केल्या. पण या चांगल्या सुरुवातीचे त्याला मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. मात्र, या 30 धावांच्या खेळीदरम्यान रोहित शर्माने एक खास कामगिरी केली आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 30 धावांच्या खेळीसह आशिया खंडात खेळताना 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा रोहित हा आठवा भारतीय आणि 16 वा आशियाई फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज फलंदाज भारताकडून हि कामगारी करू शकले आहेत.

- Advertisement -

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने छोट्या खेळीमध्ये दोन गगनचुंबी षटकार आणि २ चौकार मारले. मात्र, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये रोहितने एकूण 43 धावा केल्या. काही कारणाने तो पहिला सामना खेळू शकला नव्हता.

तिसऱ्या सामन्यात खराब फलंदाजी
भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले. त्यामुळे संपूर्ण संघ 248 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना एकट्या विराट कोहलीने केला. त्याने ७२ चेंडूंत 1 षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने 54 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र तो बाद होताच भारतीय फलंदाज एकामागून एक बाद झाले.

- Advertisement -

मला नाही वाटत कोणीही आयपीएलमध्ये ब्रेक घेईल
तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मला विश्वास आहे की एखादा खेळाडू स्वत:वरील ताण सांभाळण्यासाठी आयपीएलपासून दूर राहील. सर्व खेळाडूंना खूप अनुभव आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी लागणार आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला. पत्रकारांनी आयपीएलमधील एक-दोन सामन्यांमध्ये ब्रेक घेऊ शकतो का असे रोहितला विचारले असता. तो तथापि, मला शंका आहे की (जर) ते होईल परंतु ….” मात्र, यानंतर रोहित शर्मा शांत झाला. त्याने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -